टाटाचा धमाका ! Tata Safari Bandipur केली लॉन्च जाणून घ्या काय आहे खास ?

Tejas B Shelar
Published:

भारतीय मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने आपली तांत्रिक क्षमता आणि नावीन्यपूर्णता दाखवण्यासाठी अनेक नवी संकल्पना मॉडेल्स आणि खास आवृत्त्या सादर केल्या आहेत. या कार्यक्रमात कंपनीने Tata Safari Bandipur Edition चे अनावरण केले आहे.

ही आवृत्ती आधीच्या काझीरंगा एडिशनवर आधारित असून सध्या बाजारात काझीरंगा एडिशन उपलब्ध नाही, त्यामुळे बांदीपूर एडिशन ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.

बांदीपूर एडिशनची फीचर्स
Bandipur Edition ही नेहमीच्या सफारीपेक्षा काही अनोख्या फीचर्ससह येते. या कारमध्ये समोरच्या फेंडरवर Bandipur Edition चा बॅज देण्यात आला आहे, जो या मॉडेलला एक विशिष्ट ओळख प्रदान करतो. तसेच, याला ब्लॅक रूफसह ग्रासलँड बेज कलर दिला आहे जो ह्या Bandipur Edition या कारला अधिक प्रीमियम आणि आकर्षक स्वरूप दिसतो आहे.

Bandipur Edition इंटिरिअरचे
बांदीपूर एडिशनच्या आतील डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सीट्ससाठी एक नवीन कलर थीम वापरण्यात आली आहे, जी इंटिरिअरला स्टायलिश लूक प्रदान करते. तसेच, हेडरेस्टवर एम्बॉसिंग देण्यात आले आहे, जे या मॉडेलच्या खास फीचर्सपैकी एक ठरते. कंपनीने इंटेरिअर बाबतीत फारसे मोठे बदल केलेले नसले तरीही, या आवृत्तीचा एकंदर अनुभव अधिक प्रीमियम बनवण्यात यश मिळवले आहे.

Bandipur Edition म्हणजे काय ?
बांदीपूर एडिशन ही टाटाच्या आधीच्या काझीरंगा एडिशनवर आधारित आहे. काझीरंगा एडिशनमध्ये भारतीय गेंड्याला प्रतीक म्हणून वापरण्यात आले होते, तर बांदीपूर एडिशनमध्ये भारतीय हत्तीचा लोगो समाविष्ट करण्यात आला आहे. ही थीम केवळ वाहनाच्या प्रीमियम लूकसाठी नाही, तर भारतीय वन्यजीवनाप्रती कंपनीच्या आदराची देखील जाणीव करून देते.

एक्स्पोतील सादरीकरण आणि भविष्यातील दृष्टीकोन
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये, टाटाने केवळ वाहने सादर केली नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरकता, आणि भविष्यकालीन डिझाइन यांचा संगम सादर केला. Bandipur Edition हे या दृष्टीकोनाचे स्पष्ट उदाहरण आहे.

सुरक्षितता, तंत्रज्ञान, आणि डिझाइन यांचा उत्तम समन्वय असलेली ही आवृत्ती ग्राहकांच्या प्रीमियम सेगमेंटमधील अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम ठरेल. सध्या सर्वजण या मॉडेलच्या अधिकृत किमतीची प्रतीक्षा करत आहेत, जी या गाडीला बाजारपेठेत ठोस स्थान मिळवून देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe