एप्रिलमध्ये भारतात येणार Tesla ची पहिली इलेक्ट्रिक कार

Karuna Gaikwad
Published:

भारतात Tesla च्या आगमनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, आणि आता ती संपली आहे. Elon Musk यांची कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिल 2024 मध्ये Tesla आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी बर्लिनमधील उत्पादन केंद्रातून गाड्या आयात करून देशात विकेल. तसेच, Tesla $25,000 (सुमारे 21 लाख रुपये) पेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची शक्यता आहे.

शोरूमसाठी जागा
Tesla भारतात परवडणारी इलेक्ट्रिक कार सादर करून ग्राहकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीची थेट स्पर्धा BYD या आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत होणार आहे. जागतिक स्तरावरही BYD आणि Tesla यांच्यात चांगलीच चुरस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tesla सध्या दिल्लीतील एरोसिटी आणि मुंबईतील BKC येथे आपल्या शोरूमसाठी जागा शोधत आहे.

मुंबईत नोकरीसाठी भरती प्रक्रिया
Tesla ने भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मुंबईत नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. Store Manager, Service Advisor, Service Technician यांसारख्या विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. 13 फेब्रुवारी रोजी Elon Musk आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली, जिथे Tesla च्या भारतातील योजनांवर विचारविनिमय करण्यात आला.

पहिली कार तीन महिन्यांत !
Tesla सध्या भारतात उत्पादन सुरू करण्याचा विचार करत नाही, मात्र कंपनी यंदा $1 billion पेक्षा अधिक किंमतीचे घटक (components) भारतातून खरेदी करू शकते. येत्या काही महिन्यांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. Tesla ची परवडणारी इलेक्ट्रिक कार तीन महिन्यांत भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe