इलेक्ट्रिक कार्सची क्रेझी मागणी! एमजीने २०२६ ची सुरुवातच केली सुपरहिट

Published on -

JSW MG Motor Indiaने २०२६ वर्षाची सुरुवात अत्यंत दमदार केली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने एकूण ४,८४३ वाहनांची विक्री नोंदवली असून, ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत ९% वाढ दर्शवते. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता, प्रीमियम सेगमेंटमधील मजबूत पकड आणि आयसीई मॉडेल्सचे पुनरागमन – या तिन्ही घटकांनी एमजीला नव्या उंचीवर नेले आहे.
ग्राहकांचा कल वेगाने ईव्हीकडे झुकत असतानाच, एमजीने योग्य वेळी योग्य उत्पादने सादर करत बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, एमजीची ई-कार दरमहा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे – जे भारतीय ऑटो बाजारासाठी मोठे संकेत मानले जात आहेत. विंडसर ईव्ही बंपर सेल: एमजीच्या यशाचा कणा

एमजीची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार MG Windsor EV पुन्हा एकदा कंपनीसाठी ‘स्टार परफॉर्मर’ ठरली आहे. प्रशस्त केबिन, आक्रमक किंमत, आणि विश्वासार्ह ड्रायव्हिंग रेंज यामुळे ही ईव्ही शहरी तसेच निमशहरी ग्राहकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. याच कारणामुळे विंडसर ईव्ही आज एमजीच्या संपूर्ण ईव्ही पोर्टफोलिओचा मजबूत आधार बनली आहे. कमी रनिंग कॉस्ट आणि आधुनिक फीचर्सच्या जोरावर ही कार फर्स्ट-टाइम ईव्ही खरेदीदारांसाठीही आकर्षक पर्याय ठरत आहे.

आयसीई सेगमेंटमध्येही एमजीचा कमबॅक ईव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत असतानाच, एमजीने पेट्रोल-डिझेल म्हणजेच आयसीई विभागातही पुनरागमनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेषतः MG Hector ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हे याचे ठळक उदाहरण आहे. २०२६ ची सुरुवात एमजीसाठी आयसीई सेगमेंटमध्येही स्पर्धात्मक ठरत असून, पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्येही कंपनी पुन्हा आपले स्थान मजबूत करत असल्याचे दिसून येते.

एमजी सिलेक्ट: प्रीमियम खरेदीदारांची पहिली पसंती एमजीच्या प्रीमियम ‘एमजी सिलेक्ट’ लाइनअपलाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये स्पोर्टी इलेक्ट्रिक रोडस्टर MG Cyberster (नवीन Iris Cyan रंग पर्यायासह) आणि लक्झरी एमपीव्ही MG M9 MPV यांचा समावेश आहे. या दोन्ही मॉडेल्समुळे एमजीला हाय-एंड ग्राहक वर्गात मजबूत ओळख मिळाली असून, ब्रँडची प्रतिमा ‘फक्त ईव्ही निर्माता’ न राहता ‘प्रीमियम मोबिलिटी ब्रँड’ म्हणून अधिक ठळक होत आहे.

फॉर्च्युनरला थेट आव्हान देणारी एमजी मॅजेस्टिक लवकरच!

एमजी आता आणखी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. कंपनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आपली नवी फ्लॅगशिप एसयूव्ही एमजी मॅजेस्टिक अधिकृतपणे सादर करणार आहे. ही एसयूव्ही थेट Toyota Fortuner ला टक्कर देणार आहे. संभाव्य स्पेसिफिकेशन्सनुसार, मॅजेस्टिकमध्ये २.०-लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात येण्याची शक्यता असून ते सुमारे २१३ बीएचपी पॉवर आणि ४७८ एनएम टॉर्क निर्माण करू शकते. हे आकडे फॉर्च्युनरच्या २.८-लिटर इंजिनसाठी गंभीर आव्हान ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe