‘या’ आहेत 5 स्टार रेटिंग असलेल्या बेस्ट 7 सीटर कार, फीचर्ससुद्धा जबरदस्त

भारतीय बाजारात 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेल्या 7-सीटर गाड्या घ्यायचा विचार करत असाल तर यामध्ये टाटा सफारी आणि महिंद्रा स्कॉर्पिओ एन सर्वोत्तम पर्याय मानले जातात. या कार्सच्या फीचर्स बद्दलअधिक जाणून घेऊयात.

Published on -

7-Seater SUVs | 7 सीटर कार ही गाड्या केवळ मोठ्या कुटुंबासाठी नाही, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही आघाडीवर आहे. ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवलेल्या अशा 7-सीटर गाड्यांची यादी भारतात उपलब्ध आहे. या यादीत Tata आणि Mahindra या देशी ब्रँड्सचा समावेश आहे.

भारतामध्ये कार खरेदी करताना ग्राहकांना केवळ किंमतच नाही, तर कारचे सेफ्टी फीचर्स, इंजिन परफॉर्मन्स, सीटिंग कॅपेसिटी आणि ब्रँडवरील विश्वास या गोष्टी देखील महत्त्वाच्या वाटतात. मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर गाड्या उपयुक्त ठरतात आणि जर त्या गाड्यांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग असेल तर विश्वास अधिक वाढतो.

टाटा सफारी-

टाटा सफारी (Tata Safari) ही कार 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्लोबल एनसीएपीने या कारला अ‍ॅडल्ट ऑक्यूपंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार रेटिंग दिले आहे. या कारने 34 पैकी 33.05 गुण मिळवले आहेत. चाइल्ड ऑक्यूपंट सेफ्टीसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले. यामध्ये 7 एअरबॅग्स, आणि 17 सुरक्षा फीचर्ससह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम दिला गेला आहे.

Safari मध्ये Kryotec 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करते. टाटा सफारीचे बाजारात 32 व्हेरिएंट उपलब्ध असून त्याची किंमत 15.50 लाख ते 27.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन-

महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) ही देखील 7-सीटर SUV आहे जी 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. अ‍ॅडल्ट प्रोटेक्शनमध्ये तिला पूर्ण गुण मिळाले असले तरी चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये 3-स्टार मिळाले आहेत. या गाडीत 6 एअरबॅग्स, आणि 18 सुरक्षा फीचर्ससह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम दिला आहे.

ही गाडी दोन इंजिन पर्यायांमध्ये येते – 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (TGDi), जे 149.14 kW पॉवर आणि 380 Nm टॉर्क निर्माण करते आणि 2.2 लिटर डिझेल mHawk इंजिन, जे 128.6 kW पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. या SUV ची किंमत 13.99 लाख ते 24.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

7 सीटर आणि सेफ्टी हे दोन्ही प्राधान्यक्रम असलेल्या ग्राहकांसाठी या दोन्ही गाड्या उत्तम पर्याय ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News