वर्ष 2023 मध्ये लाँच झाल्या या टॉप 3 भन्नाट मोटारसायकल ! पहा संपूर्ण लिस्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Top Bikes 2023

Top Bikes 2023 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळावर गर्दी ओसंडून वाहत आहे. बस, रेल्वे हाउसफुल झाल्या आहेत. बसेस मध्ये आणि रेल्वे गाड्यांमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ गजबजू लागल्या आहेत.

सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान नवीन वर्षात अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही नवीन वर्षात टू व्हीलर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण 2023 मध्ये लॉन्च झालेल्या टॉप 3 स्पोर्ट्स बाईकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

TVS Apache RTR 310 : TVS ही भारतातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक बाईक्स बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान टीव्हीएस कंपनीने 2023 मध्ये आपल्या एका मॉडेलचे अपडेटेड वर्जन लॉन्च केले आहे. TVS Apache RTR 310 ही कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेली एक फ्लॅगशिप नेकेड स्पोर्ट्स बाईक आहे.

ही बाईक खूपच पावरफुल असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अधिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ही बाईक आक्रमक स्टाइलिंगमुळे तरुणांना विशेष आकर्षित करीत आहे. या गाडीचे लूक खूपच आकर्षक आहेत. ही 312.12cc लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे, जे 9700rpm वर 35bhp पॉवर आणि 6650rpm वर 28.7Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

KTM 390 Duke : KTM ही एक भारतातील प्रमुख स्पोर्ट बाईक निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या अनेक स्पोर्ट बाईक बाजारात लोकप्रिय आहेत. दरम्यान कंपनीने 2023 मध्ये नवीन ड्यूक 390 ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. ही गाडी मागील मॉडेलच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीमध्ये काही किरकोळ स्वरूपाचे पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

ही गाडी तीक्ष्ण आणि आक्रमक असा लूक देत आहे. यामुळे तरुण वर्गाला ही बाईक भुरळ घालत आहे. या गाडीचे आकर्षक लूक तरुणांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. या नवीन बाईकमध्ये 399cc चे इंजिन आहे. शिवाय यात इतर बर्‍याच गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. या बाईकचे इंजिन 45hp पॉवर आणि 39Nm टॉर्क जनरेट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन Duke 390 ही त्याच्या किमतीच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली बाइक्सपैकी एक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हिरो करिझ्मा एक्सएमआर 210 : हिरो कंपनीची स्प्लेंडर ही बाईक जशी मध्यमरग्यांमध्ये लोकप्रिय आहे तशीच कंपनीची करिझ्मा एक्सएमआर 210 ही बाईक सुद्धा स्पोर्ट्स बाईकच्या शौकीन लोकांमध्ये लोकप्रिय होणारा असा आशावाद व्यक्त होत आहे. कंपनीने 2023 मध्ये या नवीन गाडीची लॉन्चिंग केली आहे.

या गाडीचे स्टाईल आणि लूक देखील खूपच ऍक्टिव्ह आहे. यातील पॉवरट्रेन देखील अगदी नवीन आहे. या गाडीला 210cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 9,250rpm वर 25.5hp आणि 7,250rpm वर 20.4Nm चे आउटपुट जनरेट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिरोची ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय होणार आणि ग्राहकांना आवडणार असा विश्वास व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe