आनंदाची बातमी ! 2 महिन्यांनी बाजारात लॉन्च होणार ही नवीन कार, देणार 30 KMPL चे मायलेज, फीचर्स पाहून तुम्हीही पडणार प्रेमात

Ahmednagarlive24 office
Published:

New Car Launch : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही तास शिल्लक राहिले आहेत. येत्या काही तासात 2024 ला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नवीन वर्षात अनेक लोकांनी नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कार प्रेमीसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की मारुती सुझुकीने मध्यमवर्गीयांसाठी मारुती सुझुकी स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अनेकदा ट्रायल दरम्यान नजरेस पडली आहे. पण आता ही गाडी प्रत्यक्षात लॉन्च होणार आहे. मारुती स्विफ्ट ही देशातील एक सर्वात जास्त विक्री होणारी हॅचबॅक कार आहे.

ही गाडी मध्यमवर्गीयांची विशेष आवडती कार आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. या गाडीचा लुक चेंज होणार आहे तसेच इंजिन देखील पूर्णपणे बदलले जाऊ शकते असा अंदाज आहे. मीडिया रिपोर्टनुसार या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये हायब्रीड ऑप्शन मिळणार आहे. ही गाडी मायलेजसाठी खूपच उत्कृष्ट राहणार आहे. या गाडीचे मायलेज हे चांगल्या-चांगल्या सीएनजी गाड्यांना टक्कर देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही फेसलिफ्ट कार दोन इंजिन ऑप्शन सोबत बाजारात उतरवली जाणार आहे. कंपनी 1.2 लिटर नॅचरली इस्पिरेटेड पेट्रोल इंजनसह सीएनजी वेरियंट लॉन्च करणार आहे. तसेच इंजिनच्या दुसऱ्या प्रकारात 1.2 लिटर हायब्रीड ऑप्शन उपलब्ध करून दिला जाणार आहे. एक स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन राहणार आहे ज्याचे मायलेज 30 किलोमीटर प्रति लिटर पेक्षा जास्त राहू शकते असा दावा केला जात आहे.

काय-काय फीचर्स राहणार

या गाडीच्या डिटेल्स बाबत कंपनीच्या माध्यमातून अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर कंपनीने कारमधील सेफ्टी फीचर्सची पूर्ण काळजी घेतली आहे. कारमध्ये आता 6 एअरबॅग उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग कॅमेरा, चाइल्ड आयसोफिक्स सीट्स यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स देखील राहणार आहेत.

या नव्याने लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्ट कारमध्ये 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिकली 6-वे अॅडजस्टेबल सीट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल OVRM, रिअर एसी व्हेंट्स, क्लायमेट कंट्रोल एसी, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले यांसारखी फिचर्स देखील पाहायला मिळणार आहेत.

काय असणार किंमत

मीडिया रिपोर्टनुसार या गाडीची किंमत सात लाख रुपयांपासून ते 14 लाख रुपये पर्यंत राहणार आहे. ही किंमत एक्सशोरूम किंमत राहणार आहे. म्हणजेच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. या गाडीच्या लॉन्चिंग बाबत बोलायचं झालं तर अजूनही कंपनीच्या माध्यमातून अधिकृत अशी अपडेट समोर आलेली नाही. मात्र नवीन वर्षात ही गाडी लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe