Top 3 CNG SUV Car : आता भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सची इंट्री झाली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि वाढते प्रदूषण पाहता सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असून ऑटो मेकर कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादित करण्याला पसंती दाखवत आहेत.
ग्राहक देखील इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. मात्र असे असले तरी आजही अनेक जण पेट्रोल आणि डिझेल गाड्यांना अधिक प्राधान्य दाखवत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काही जण सीएनजी कार खरेदी करण्यास पसंती दाखवत आहेत.
दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात सीएनजी एसयुव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फायद्याचा ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील टॉप तीन एसयूव्ही कारची माहिती पाहणार आहोत. या यादीत टाटा कंपनीची कार पहिल्या क्रमांकावर आहे. चला तर मग जाणून घेऊया देशातील टॉप तीन सीएनजी एसयुव्ही.
Tata Punch SUV : टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक उप कंपनी आहे. या कंपनीने अनेक सीएनजी गाड्या लॉन्च केल्या आहेत. यामध्ये टाटा पंच एसयूव्ही चा देखील समावेश होतो. ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी SUV कार आहे. देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या SUV मध्ये ही कार पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष.
याचे सीएनजी व्हेरिएंट देखील मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. या गाडीचे सीएनजी व्हेरिएंट 26.99 किलोमीटर प्रति किलोग्राम एवढे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. या गाडीची सुरुवातीची एक शोरूम किंमत 7.23 लाख रुपये एवढी आहे. या गाडीचे फीचर्स आणि परफॉर्मन्स खूपच उत्कृष्ट आहे.
ह्युंदाई एक्स्टर : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात ह्युंदाई कंपनीने ही SUV लाँच केली आहे. लॉन्च झाल्यापासून ही गाडी खूपच चर्चेत आहे. भारतीय ग्राहकांमध्ये Hyundai Exeter ची मागणी सातत्याने वाढत आहे. ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV च्या यादीत आली आहे. ही गाडी सीएनजी व्हेरियंट मध्ये देखील उपलब्ध आहे.
एक्स्टर CNG 27.1 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देते. एक्स्टर CNG ची एक्स-शोरूम किंमत ही 8.43 लाख रुपये आहे. देशातील टॉप तीन एसयूव्ही मध्ये या गाडीचा देखील समावेश होतो. किमतीच्या बाबतीत ही गाडी ग्राहकांना परवडणारी ठरत आहे. यामुळे या गाडीला मागणी वाढतच आहे.
मारुती सुझुकी फ्रोंक्स : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी आणि कार मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे. या कंपनीची Maruti Suzuki Fronx ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही बनली आहे.
ही गाडी गेल्या वर्षी लॉन्च झाली आहे. लॉन्च होऊन अजून या गाडीला एक वर्षही पूर्ण झालेला नाही. मात्र एक वर्षाच्या आतच या गाडीचे एक लाख युनिट विकले गेले आहेत.
जी की एक मोठी अचीवमेंट आहे. याचे सीएनजी वेरियंट देखील उपलब्ध आहे. याचे सीएनजी व्हेरिएंट २८.५१ किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देते. Maruti Suzuki Fronx CNG ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,46,500 रुपये एवढी ठेवण्यात आहे.