2023 मध्ये लॉन्च झालेल्या टॉप 3 स्कूटर आणि त्यांच्या विशेषता, पहा संपूर्ण यादी

Ahmednagarlive24 office
Published:

New Launch Scooter : नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. 2024 हे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो यासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज थर्टी फर्स्टच सेलिब्रेशन होणार आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्षात अनेकजण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

काहीजण कार खरेदी करतील काही जण टू व्हीलर खरेदी करतील तर काहीजण कमर्शियल वाहनांची खरेदी करणार आहेत. दरम्यान, टू व्हीलर खरेदी करणाऱ्यांसाठी विशेषता स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास ठरणार आहे. कारण की, आज आपण वर्ष 2023 मध्ये अर्थातच या चालू वर्षात लॉन्च झालेल्या टॉप 3 स्कूटर विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

होंडा एक्टिवा : होंडा ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. ऑटो सेक्टर मधील ही दिग्गज कंपनी भारतात खूपच लोकप्रिय आहे. या कंपनीची होंडा एक्टिवा ही स्कूटर भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणून ओळखली जाते. बाजारात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असतानाही या पेट्रोल स्कूटरची क्रेज कमी होत नाहीये.

कंपनीने यावर्षी आपले 6G स्मार्ट मॉडेल लाँच केले होते, ज्यामध्ये स्मार्ट-की फीचर्स सादर करण्यात आले आहेत. ही 109.51cc BS6 स्कूटर बाजारात 76,234 रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत उपलब्ध आहे.

हिरो झूम : एकेकाळी होंडाची पाटनर कंपनी हिरो कंपनीची झूम ही स्कूटर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीने ही स्कूटर 2023 मध्येच लाँच केली आहे. कॉर्नरिंग लॅम्पसह येणारी ही पहिलीच स्कूटर आहे. हीरो ही देखील देशातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक बाईक्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.

कंपनीची झूम स्कूटर सुद्धा अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहे. ही स्कूटर 110cc मध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यात अनेक अप्रतिम प्रगत वैशिष्ट्ये पाहता येतील. ही गाडी 75,503 रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

Ather : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या आहेत. पेट्रोलवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी आता अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटी चालवू लागले आहेत. तिसऱ्या स्थानावर Ather च्या 450X आणि 450S या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या या स्कूटर 2023 मध्येच अर्थातच या चालू वर्षातच लॉन्च झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe