Top Budget Car:- गाडी खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र लक्झरी कारच्या उच्च किमतीमुळे त्या बहुतांश मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असतात. तरीही जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम लुक आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह कार शोधत असाल तर भारतीय बाजारात काही उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत. या गाड्या आधुनिक तंत्रज्ञानासह आलिशान ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. चला तर मग या लेखामध्ये आपण अशा काही बजेट-फ्रेंडली प्रीमियम कार्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
टॉप बजेट फ्रेंडली कार
![top budget car](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/vb.jpg)
मारुती सुझुकी बलेनो –
मारुती सुझुकी बलेनो ही प्रीमियम हॅचबॅक कार असून ती स्टाइल, आराम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले, २२.८६ सेमी एचडी स्मार्टप्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ३६०-डिग्री कॅमेरा उपलब्ध आहे.जो पार्किंगमध्ये मदत करतो. सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्सही देण्यात आल्या आहेत.
बलेनो सात आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून तिचा डेल्टा सीएनजी व्हेरिएंट ८.४० लाख तर झेटा सीएनजी व्हेरिएंट ९.३३ लाख (एक्स-शोरूम) किंमतीत मिळतो. कमी बजेटमध्ये स्टायलिश आणि उच्च-प्रदर्शन देणारी ही एक उत्तम निवड आहे.
ह्युंदाई क्रेटा
ह्युंदाई क्रेटा ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. ही कार तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, १.५ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिन. ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल,
इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. क्रेटाची सुरुवातीची किंमत १३.२४ लाख असून टॉप मॉडेल २४.३७ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक फिचर्समुळे ही एसयूव्ही एक उत्तम पर्याय ठरते.
टाटा नेक्सॉन
टाटा नेक्सॉन ही एक दमदार आणि स्टायलिश कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून तिच्या आधुनिक वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. यात १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १२० बीएचपी आणि १७० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. याशिवाय, कारच्या केबिनमध्ये १०.२५-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
ही कार सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्तम असून सुरुवातीची किंमत ८.१५ लाख आहे, तर टॉप व्हेरिएंट १५.८० लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. सुरक्षितता आणि प्रीमियम अनुभव देणारी ही कार मध्यमवर्गीयांसाठी एक चांगला पर्याय आहे.
होंडा एलिव्हेट
होंडा एलिव्हेट ही एक प्रीमियम एसयूव्ही असून ती १.५ लिटर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन ११९ बीएचपी आणि १४५ एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, १७-इंच ड्युअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हील्स, ७-इंच एचडी फुल-कलर टीएफटी क्लस्टर आणि १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.
याशिवाय, सुरक्षिततेसाठी होंडा सेन्सिंग सूट देण्यात आला आहे. जो प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स वैशिष्ट्यांसह येतो. होंडा एलिव्हेटची सुरुवातीची किंमत ११.९१ लाख (एक्स-शोरूम) आहे.