Top 5 Cars:- गाडी खरेदी करताना फीचर्स आणि किंमत दोन्ही महत्त्वाची असतात. भारतीय बाजारात आता अनेक परवडणाऱ्या कार्स येत आहेत. ज्या आधुनिक तंत्रज्ञानाने भरलेल्या आहेत. खासकरून व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, मोठे टचस्क्रीन आणि सेफ्टी फीचर्स यामुळे या कार्स लोकप्रिय ठरत आहेत. चला तर मग पाहूया अशा टॉप ५ कार्स ज्या उत्तम फीचर्ससह आणि किफायतशीर किमतीत उपलब्ध आहेत!
टॉप पाच परवडणाऱ्या कार
टाटा अल्ट्रोज
टाटा अल्ट्रोज ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि स्टायलिश हॅचबॅकपैकी एक आहे. यामध्ये 1.2-लिटर इंजिन असून 87 बीएचपी आणि 115 एनएम टॉर्क निर्माण करते.
आकर्षक डिझाइन आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे अल्ट्रोज लोकप्रिय ठरते. यामध्ये तुम्हाला मिळतील 10.24-इंच टचस्क्रीन, इलेक्ट्रॉनिक सनरूफ,वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हेंटिलेटेड सीट्स (XZA प्लस (O) S व्हेरिएंटपासून सुरू)
किंमत – 12.94 लाख (ऑन-रोड, मुंबई)
टाटा पंच EV
टाटा पंच EV ही भारतातील परवडणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पैकी एक आहे. जबरदस्त रेंज आणि उत्कृष्ट सेफ्टीसाठी ही कार ओळखली जाते. यामध्ये 25 kWh बॅटरी असून 315 किमीची रेंज मिळते. महत्त्वाचे फीचर्स इलेक्ट्रिक सनरूफ, 7-इंच टचस्क्रीन, BNCAP 5 स्टार सेफ्टी रेटिंग,व्हेंटिलेटेड सीट्स (एम्पॉवर्ड प्लस 3.3 व्हेरिएंट आणि त्यावरील व्हेरिएंटमध्ये उपलब्ध)
किंमत – 13.44 लाख (ऑन-रोड, मुंबई)
किआ सोनेट
किआ सोनेट ही तिच्या स्टायलिश डिझाइन आणि दमदार इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. सोनेटमध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 बीएचपी आणि 172 एनएम टॉर्क निर्माण करते.
7-स्पीड DCT ट्रान्समिशनमुळे ही कार चांगली परफॉर्म करते. आकर्षक फीचर्स बघितली तर इलेक्ट्रॉनिक सनरूफ,8-इंच टचस्क्रीन,वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले,व्हेंटिलेटेड सीट्स (HTX पेट्रोल DCT आणि त्यापेक्षा उच्च व्हेरिएंटमध्ये उपलब्ध)
किंमत – 14.83 लाख (ऑन-रोड, मुंबई)
मारुती सुझुकी XL6
जर तुम्हाला मोठ्या कुटुंबासाठी कार हवी असेल, तर मारुती सुझुकी XL6 हा उत्तम पर्याय आहे. या MUV मध्ये 1.4-लिटर स्मार्ट-हायब्रिड इंजिन असून 102 बीएचपी आणि 137 एनएम टॉर्क आहे.
ही कार अधिक स्पेस आणि आरामदायी सीटसाठी ओळखली जाते. वैशिष्ट्ये – 7-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले,कीलेस एंट्री,व्हेंटिलेटेड सीट्स (अल्फा आणि अल्फा प्लस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध)
किंमत – 15.50 लाख (ऑन-रोड, मुंबई)
ह्युंदाई व्हेन्यू
ह्युंदाई व्हेन्यू ही नेहमीच आपल्या स्टायलिश लूक आणि शानदार फीचर्समुळे चर्चेत असते. यामध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून 118 बीएचपी आणि 172 एनएम टॉर्क आहे.
यामध्ये खालील शानदार फीचर्स आहेत. पॅनोरॅमिक सनरूफ,10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट्स (SX(O) आणि त्यापुढील व्हेरिएंटमध्ये उपलब्ध)
किंमत – अंदाजे 14-15 लाख (ऑन-रोड, मुंबई)