Top CNG Cars In India : कमी किमतीमध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही या बातमीमध्ये आज तुम्हाला आपल्या देशातील बाजारात जास्त स्पेस आणि जबरदस्त मायलेजसह उपलब्ध असणाऱ्या काही सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत.
ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त स्पेस आणि बेस्ट मायलेज असणारी सर्वात भारी कार खरेदीचा स्वप्न पूर्ण करू शकतात. चला मग जाणून घेऊया कमी किमतीमध्ये देशातील बाजारात जास्त स्पेस आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या सीएनजी कार्सबद्दल संपूर्ण माहिती.
Tata Altroz iCNG
टाटा मोटर्सने आपल्या प्रिमियम हॅचबॅक कार Altroz चे CNG मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत 7.55 लाख रुपये ठेवली आहे . विशेष बाब म्हणजे हे मॉडेल 6 व्हेरियंटमध्ये येईल. टाटाने यात ड्युअल सीएनजी सिलिंडर वापरला आहे, ज्याच्या मदतीने ते बूट स्पेस खराब करत नाही आणि तुम्ही तुमचे सामान त्यामध्ये सहज ठेवू शकता. यात 1.2L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. कंपनीने असे म्हटले आहे की ट्विन सीएनजी सिलेंडर लोड फ्लोरच्या खाली संरक्षित वाल्व आणि पाईप्ससह लगेज एरियाखाली आहेत, ज्यामुळे संभाव्य नुकसानाचा धोका कमी होतो.
Maruti Suzuki WagonR CNG
फॅमिली कार वॅगनआर सीएनजी देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये स्पेसही चांगली आहे, पण सामान ठेवण्यासाठी स्पेसची कमतरता आहे. ही 1.0-लिटर K10C इंजिनद्वारे समर्थित आहे जे CNG मोडमध्ये 57hp पॉवर आणि 82Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 34.04 किमी/किलो मायलेज देते. कारची किंमत 6.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Maruti Suzuki Celerio CNG
सेलेरिओची डिजाईन खूपच आकर्षक आहे. जेव्हापासून ती त्याच्या नवीन अवतारात आली आहे तेव्हापासून त्याच्या खरेदीदारांची लाईन लांबली आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये उपलब्ध आहे. याला 1.0 लिटर K10C इंजिन मिळते जे CNG मोडमध्ये 57hp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते. कार 35.60 किमी/किलो मायलेज देण्याचे वचन देते. Celerio CNG ची किंमत 6.73 लाख रुपये आहे. यामध्ये केबिनची स्पेस चांगली आहे पण तुम्हाला बूटमध्ये कमी जागा मिळेल.
Tata Tiago CNG
टाटाचा टियागो सीएनजीही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या कारमध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे 3 सिलिंडर असलेले रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे CNG मोडवर 73hp पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. ही कार 26km/kg मायलेज देते. कारची किंमत 6.40 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये केबिनची जागा चांगली आहे पण तुम्हाला बूटमध्ये कमी जागा मिळेल.
हे पण वाचा :- Amazon Offer : मस्तच! Oppo चा नवीन 5G फोन मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये, ऑफर जाणून वाटेल आश्चर्य