Top CNG SUV In India : या आहेत देशातील टॉप ४ SUV सीएनजी कार! किंमत 10 लाखांपेक्षा कमी, पहा यादी

Ahmednagarlive24 office
Published:
Top CNG SUV In India

Top CNG SUV In India : भारतात सध्या एसयूव्ही कारची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. दिवसेंदिवस ग्राहक एसयूव्ही कारला अधिक पसंती देत आहेत. तसेच सध्या ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. सीएनजी कारच्या किमती कमी आणि मायलेज अधिक असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या सीएनजी एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच या सीएनजी एसयूव्ही कारच्या किमती देखील कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या बजेटमधील या सीएनजी एसयूव्ही कार आहेत. खालील सीएनजी एसयूव्ही कार १० लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये येतात.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स सीएनजी

मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विक्रीच्या अव्वल स्थानी आहेत. नुकतीच मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची आणखी एक स्वस्त सीएनजी एसयूव्ही Fronx कार सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.42 लाख ते 9.28 लाख रुपये आहे.

या कारमध्ये मारुतीकडून 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड द्वि-इंधन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सीएनजी मोडमध्ये ७६.५ बीएचपी पॉवर आणि ९८.५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले गेलेले आहे.

Hyundai Exter CNG

ह्युंदाई कंपनीकडून त्यांची Exter CNG कार या जुलै महिन्यामध्येच भारतात लॉन्च केली आहे. या कारमध्ये ह्युंदाईकडून सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. या कारमध्ये 1.2-लिटर द्वि-इंधन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारचे इंजिन CNG मोडमध्ये 68 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या कारची एस शोरूम किंमत 8.24 लाख ते रु. 8.97 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी

मारुती सुझुकी कंपनीची आणखी एक सर्वाधिक प्रसिद्ध असलेली सीएनजी कार ब्रेझा एस-सीएनजी टॉप सीएनजी एसयूव्ही कारमध्ये मोडते. या कारमध्ये कंपनीकडून 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन CNG मोडमध्ये 86.7 bhp पॉवर आणि 121 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या कारची एक्स शोरूम किंमत 9.24 लाख ते 12.15 लाख रुपये आहे.

टाटा पंच iCNG

टाटा मोटर्सकडून त्यांच्या कारमध्ये देखील सीएनजी पर्याय दिला जात आहे. त्यांच्या सर्वात लहान एसयूव्ही कार पंचमध्ये देखील सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड बाय-इंधन पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे.

पंच कारमध्ये देण्यात येणारे इंजिन सीएनजी मोडमध्ये 76 bhp पॉवर आणि 97 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ६ लाख ते १० लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe