Top Selling SUV Car In India : देशातील ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा दबदबा आहे. तसेच सर्वाधिक कार विक्रीचा यादीत मारुती सुझुकी कार निर्माती कंपनी अव्वल स्थानी आहे. मात्र देशात सर्वाधिक एसयूव्ही विकण्याच्या बाबतीत टाटाने मारूतीलाही मागे टाकले आहे.
देशातील ऑटो क्षेत्रात सध्या एसयूव्ही कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांनी सेडान कारकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तसेच ग्राहकांचा एसयूव्ही कारकडे अधिक कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
टाटा मोटर्सच्या नेक्सॉन या एसयूव्ही कारने ब्रेझा – क्रेटालाही मागे टाकले आहे. जानेवारीमध्ये भारतीय ऑटो क्षेत्रात कारची बंपर विक्री झाली आहे. यामध्ये मारुती सुझुकी ही सर्वाधिक कार विकणारी कंपनी ठरली आहे.
सर्वाधिक कार विकण्याचा मान मारुती सुझुकी कंपनीनेच मिळवला आहे. टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या कार विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसले.
मारुती सुझुकी कंपनीच्या अल्टो कारची देशामध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये या कारची 21,411 युनिट्स विकली गेली आहेत. तसेच मारुतीची वॅगनआर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची जानेवारी 2023 मध्ये 20,466 युनिट्स विकली गेली आहेत.
जर देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारबद्दल बोललो तर टाटा मोटर्सने पुन्हा एकदा सर्वांना मागे टाकले आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन या एसयूव्हीची कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. तसेच या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी २०२३ मध्ये नेक्सॉन SUV कारची 15,567 युनिट्स विकली गेली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत नेक्सॉनच्या विक्रीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ मध्ये 13,816 युनिट्सची विक्री झाली होती. टाटा नेक्सॉन कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.80 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 14.30 लाख रुपयांपर्यंत जाते.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर SUV कारची विक्री करण्यात ह्युंदाईने स्थान मिळवले आहे. ह्युंदाई कंपनीने त्यांच्या Creta कारची जानेवारी २०२३मध्ये 15,037 युनिट्सची विक्री केली आहे. त्यांच्या कार विक्रीमध्ये तब्बल ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी 9,869 युनिट्सची विक्री केली होती.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर एसयूव्हीची विक्री करण्यात मारुती सुझुकीने स्थान मिळवले आहे. मारुती सुझुकी कंपनीने त्यांच्या ब्रेझा SUV कारची जानेवारी 2023 मध्ये 14,359 युनिट्स विकली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये ब्रेझाच्या ९,५७६ युनिट्सची विक्री झाली होती. यावर्षी तब्बल ब्रेझाच्या विक्रीत ४९ टक्के वाढ झाली आहे.