Toyota Discount Offer : नव्याने कार खरेदी करू इच्छित असाल तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की, या महिन्यात अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना मोठा डिस्काउंट ऑफर दिला जातोय. विशेषता ज्यांना प्रीमियम कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा महिना खास ठरणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात टोयोटा इंडिया कडून देखील आपल्या अनेक लोकप्रिय मॉडेल्स वर लाखो रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आला आहे. टोयोटा आपल्या एका लोकप्रिय गाडीवर तब्बल 13 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. फॉर्च्यूनर वर सुद्धा कंपनीकडून मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

त्यामुळे जर तुम्हाला अशा गाड्या घ्यायच्या असतील तर तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. दरम्यान आता आपण टोयोटा कंपनीकडून कोणत्या गाड्यांवर किती रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोयोटा ग्लांझा : या गाडीवर कंपनीकडून 1.27 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. टोयोटा ग्लांझाचे बेस मॉडेल 6.39 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहेत. तसेच याचे टॉप मॉडेल 9.15 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
अर्थात कंपनीची ही एक इंट्री लेव्हल कार असून या गाडीला भारतात प्रचंड मागणी आहे. दरम्यान आता कंपनीकडून या गाडीवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात असल्याने या गाडीची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टोयोटा हायराइडर : तुम्ही जर या नोव्हेंबर महिन्यात ही गाडी खरेदी केली तर तुम्हाला 1.51 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.95 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेल ची किंमत 19.76 लाख रुपये एक्स शोरूम आहे.
टोयोटा कॅमरी : टोयोटाची ही प्रीमियम सेडान कार आता ग्राहकांना आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या गाडीवर 5.43 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर आणला आहे.
या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 47.48 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे जर तुम्हाला टोयोटाची प्रीमियम गाडी घ्यायची असेल आणि त्यावर लाखो रुपये वाचवायचे असतील तर ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
टोयोटा वेलफायर : ग्लोबल मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी टोयोटा वेलफायर भारतात आणखी काही रुपयांनी स्वस्त झाली आहे. खरे तर ज्यांचे बजेट दीड कोटीच्या आसपास आहे त्यांच्यासाठी ही गाडी फायद्याची आहे.
दरम्यान आता या गाडीवर कंपनीकडून 10.85 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय. या गाडीची एक्स शोरूम किंमत 1.2 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि साधारणतः 1.3 कोटी रुपयांपर्यंत जाते. लक्झरी एमपीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी या गाडीचा ऑप्शन बेस्ट राहणार आहे.
टोयोटा लँड क्रूझर 300 : कंपनी या गाडीवर सर्वाधिक डिस्काउंट देत आहे. ज्या लोकांनी या चालू महिन्यात ही गाडी खरेदी केली त्यांना जवळपास 13.17 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 2.16 कोटी रुपये ते 2.25 कोटी रुपये दरम्यान आहे.
नक्कीच ज्या लोकांचे अडीच कोटीच्या आसपास बजेट असेल आणि त्यांना ही गाडी खरेदी करायची असेल तर त्यांनी नोव्हेंबरमध्ये ही गाडी खरेदी करायला हवी जेणेकरून त्यांचे 13 लाख रुपये वाचतील.
फॉर्च्यूनरवर किती डिस्काउंट मिळतोय
टोयोटा फॉर्च्युनर ही कार भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. शेठ लोकांची गाडी म्हणून याकडे पाहिले जाते. फॉर्च्युनर म्हणजे भारतात स्टेटस सिम्बॉल. वाढीव विषय, राडा, धूर, जाळ, काळा घोडा, पांढरा हत्ती, हत्यार असे वेगवेगळे विशेषण ज्या गाडीला प्राप्त झालेत ती गाडी म्हणजे फॉर्च्यूनर. कंपनीसाठी ही गाडी खरंच फॉर्च्यून ठरली आहे.
या गाडीने भारतातील कंपनीची उपस्थिती अधिक बळकट केली असून कंपनीच्या फॉर्च्यून या गाडीने पूर्णपणे बदलून काढले आहे. दरम्यान तुम्हालाही हा काळा घोडा तुमच्या दावणीला बांधायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
या गाडीवर कंपनीकडून एक लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय. या गाडीची एक्स शोरूम किंमत 33.65 लाख रुपयांपासून सुरू होते तसेच टॉप मॉडेल ची किंमत 48.85 लाख एक्स शोरूम एवढी आहे.











