Toyota Innova Crysta : ग्राहकांना झटका! टोयोटाच्या ‘या’ शक्तिशाली कारसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, जाणून घ्या नवीनतम किमती

Published on -

Toyota Innova Crysta : टोयोटाच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यापैकी इनोवा क्रिस्टा ही टोयोटाची सर्वात शक्तिशाली कार मानली जाते. काही दिवसांपूर्वी कंपनीने ही शक्तिशाली कार बाजारात लाँच केली होती.

किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 19,99,000 रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत 26,05,000 रुपयांपर्यंत जाते. परंतु ग्राहकांना आता या कारसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नुकतीच कंपनीने किमतीत वाढ केली आहे.कंपनीच्या या कारला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु आता तुम्हाला या कारसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

किमतीत झाली वाढ

Toyota Innova Crysta च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या टॉप-स्पेक ZX व्हेरियंटच्या किमतीत आता एकूण 37,000 रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची नवीन एक्स-शोरूम किंमत 26.05 लाख रुपये इतकी झाली आहे.

तर त्याच वेळी, कंपनीने VX व्हेरियंटच्या 7-सीटर आणि 8-सीटर व्हेरियंटच्या किंमतीत 35,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.आता त्याची नवीन एक्स-शोरूम किंमत 24.39 लाख रुपयांपासून सुरू होते तर ती 24.44 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु हे लक्षात घ्या की त्याच्या एंट्री-लेव्हल GX व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही.

मिळतील 5 रंग पर्याय

इनोव्हा क्रिस्टाच्या कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास तर सुपर व्हाइट, एवंट-गार्ड ब्रॉन्झ मेटॅलिक, अॅटिट्यूड मीका ब्लॅक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि सिल्व्हर मेटॅलिक 5 विविध रंग पर्यायामध्ये येते.

इंजिन पॉवरट्रेन

Innova Crysta च्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 2.4-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय दिला जात आहे, जो 148bhp पॉवर आणि 343Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असून हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे.

जाणून घ्या किंमत

आता Toyota Innova Crysta च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ₹19,99,000 पासून सुरू होते तर टॉप मॉडेलसाठी ₹26,05,000 पर्यंत जाते. तसेच रंग, प्रकार आणि सीटिंग पर्यायासह, त्याच्या किंमती देखील कमी किंवा जास्त असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe