१५ मार्च २०२५ बंगळुरू : वाढत्या स्टायलिश, साहसी आणि उच्च-कार्यक्षम एसयूव्हीच्या मागणीला प्रतिसाद देत, टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने टोयोटा लेजेंडर ४ x ४ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली एसयूव्ही सादर केली आहे.थ्रिल-प्रेमी ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही नवी एसयूव्हीची श्रेणी पॉवर, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण सादर करणारी आहे.
२०२१ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण केल्यापासून लेजेंडर एसयूव्हीने आपल्या ४ x ४ क्षमतांमुळे ऑफ-रोड सफारींसाठी परिपूर्ण साथीदार म्हणून ओळख मिळवली आहे. या एसयूव्हीमध्ये अतुलनीय ताकद देणारे शक्तिशाली २.८ लिटरचे डिझेल इंजिन असून, ती २४० पीएसची पॉवर आणि ४२० एनएम टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे वाहन चालकास आपल्या वाहनावर संपूर्ण नियंत्रण मिळते. यातील ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमुळे अचुकता वाढते आणि रोमांचक प्रवासाचा आनंद मिळतो.

टोयोटाची प्रगत ४ x ४ तंत्रज्ञान प्रणाली कोणत्याही भू प्रदेशावर सहज वाहन चालविण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे ही एसयूव्ही शहरांतर्गत प्रवास आणि ऑफ रोड सफारीसाठी एक आदर्श साथीदार बनते. याप्रसंगी टोयोटाच्या विक्री-सेवा-वापरलेल्या कार व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, आम्ही टोयोटा लेजेंडरच्या नवीन श्रेणीचे अनावरण करताना उत्साही आहोत, एमटी व्हेरिएंटच्या या नव्या श्रेणीमुळे लेजेंडरची आकर्षकता वाढेलच, शिवाय टोयोटाचे ग्राहकांच्या गतिशील गरजा पूर्ण करण्यासाठी बहुपर्यायी उपाय प्रदान करण्याचे वचनही दृढ होईल.