Toyota Urban Cruiser Hyryder : अवघ्या 1 लाखात खरेदी करा टोयोटाची मिनी फॉर्च्युनर! पहा शक्तीशाली फीचर्स आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
Toyota Urban Cruiser Hyryder

Toyota Urban Cruiser Hyryder : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शक्तिशाली का उपलब्ध आहेत. तसेच अनेकांचे फॉर्च्युनर खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र तिची किंमत अधिक असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही. मात्र आता तुम्ही टोयोटोची मिनी फॉर्च्युनर अगदी कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता.

तुम्हालाही टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल आणि बजेट कमी पडत आहेत तर काळजी करू नका. कारण आता कंपनीकडून कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांचा विचार करत त्यांच्यासाठी मिनी फॉर्च्युनर सादर केली आहे.

टोयोटाच्या मिनी फॉर्च्युनर कारचे नाव अर्बन क्रूझर हायरायडर असे आहे. कंपनीकडून या कारचा लूक आणि डिझाईन फॉर्च्युनर कारसारखी देण्यात आली आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे ग्राहक कंपनीची मिनी फॉर्च्युनर हायरायडर कार खरेदी करू शकतात.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर लॉन्च

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये टोयोटा कार निर्मिती कंपनीकडून त्यांची मिनी फॉर्च्युनर कार गेल्या काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. मात्र तुमचे बजेट कमी असेल तरीही तुम्ही १ लाख रुपयांमध्ये मिनी फॉर्च्युनर हायरायडर कार खरेदी करू शकता.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरचे कंपनीकडून एकूण ४ मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीकडून E, S, G आणि V अशी चार मॉडेल सादर करण्यात आली आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही कार खरेदी करू शकता.

Toyota Urban Cruiser Hyryder चे डाउनपेमेंट तपशील

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला अर्बन क्रूझर हायराईडर ही टोयोटाची मिनी फॉर्च्युनर खरेदी करायची असेल तर तुम्ही १ लाख रुपयांच्या डाउनपेमेंट मध्ये ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

जर तुम्ही या कारचे बेस E व्हेरियंट खरेदी केले तर १ लाख रुपयांचे डाउनपेमेंट केले तर बाकीचे पैसे तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात दिले जातील. या कर्जाची तुम्हाला ६० महिन्यांची परतफेड करावी लागेल. यासाठी तुम्हाला घेतलेल्या कर्जावर 23,779 रुपये प्रति महिना हफ्ता येईल. तसेच तुम्ही ७ वर्षांची परतफेड देखील घेऊ शकता.

Toyota Urban Cruiser Hyryder चे शक्तिशाली इंजिन आणि उत्तम मायलेज

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर कारमध्ये तुम्हाला १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच या कारचे S आणि G मॉडेल सीएनजी प्रकारामध्ये देखील उपलब्ध आहे. या कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीडमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच या कारच्या टॉप मॉडेलमध्ये हायब्रीड इंजिन देखील देण्यात आले आहे. या कारचे सीएनजी मॉडेल 26.6 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरची वैशिष्ट्ये

कंपनीकडून या कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, हवेशीर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर अशी धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक वितरण (इलेक्ट्रॉनिक ब्रेक) EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम वाहन स्थिरता नियंत्रण, ऑल व्हील डिस्क ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा असे अनेक नवीन फीचर्स कंपनीकडून या मिनी फॉर्च्युनर कारमध्ये देण्यात आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe