Toyota Cars : TOYOTA INDIA देशात Glanza चे CNG व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी मारुती बलेनो सीएनजी नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली होती.
एका मीडिया रिपोर्टनुसार, आता 2022 Toyota Glanza CNG ची अनऑफिशियल बुकिंग देखील सुरु झाली आहे. काही डीलरशिप्सनी त्यांच्या स्तरावर बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. टोयोटाचे हे देशातील पहिले सीएनजी मॉडेल असेल.
मारुती सुझुकी आपल्या सीएनजी कारला S-CNG म्हणते. त्याच वेळी, TOYOTA चे हे E-CNG मॉडेल असणार आहे. टोयोटा ग्लान्झा ही जपानी कार निर्माता कंपनीची भारतातील पहिली CNG-चालित कार असेल.
काही आठवड्यांपूर्वी, आगामी Toyota Glanza CNG चे स्पेसिफिकेशन्स आणि वेरिएंट देखील लीक झाले होते, त्यानुसार यात स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळेल असे सांगण्यात आले होते.
लीक झालेल्या माहितीनुसार, हे इंजिन पेट्रोलवर 88.5 Bhp पॉवर आणि CNG वर 77 Bhp पॉवर जनरेट करेल. इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल आणि सुमारे 30 किमी/किलोचे CNG मायलेज देऊ शकेल. टोयोटा ग्लान्झा सीएनजी 3 प्रकारांमध्ये देखील ऑफर केली जाऊ शकते – S, G आणि V.
कंपनी लवकरच या प्रीमियम हॅचबॅकच्या CNG आवृत्तीच्या किमती जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, TOYOTA Glanza च्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.59 लाख ते 9.99 रुपये आहे. ती मारुती सुझुकी बलेनो, टाटा अल्ट्रोझ आणि ह्युंदाई i20 सारख्या कारशी स्पर्धा करते. याच्या CNG व्हेरियंटची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 50 ते 70 हजार रुपये जास्त असू शकते.