Toyota : टोयोटा नुकत्याच अनावरण केलेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरची किंमत पुढील आठवड्यात जाहीर करणार आहे. ही मध्यम आकाराची SUV Hyundai Creta ला टक्कर देईल. विशेष म्हणजे हायराइडरमध्ये हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. हे मारुती सुझुकीसोबत भागीदारी अंतर्गत बनवले गेले आहे. दोन्ही एसयूव्हीच्या फीचर्समध्ये अनेक समानता असेल.
टोयोटा नंतर, मारुती सुझुकी देखील आपल्या ग्रँड विटाराच्या किंमती सप्टेंबरमध्ये जाहीर करू शकते. मात्र, ग्रँड विटाराची लीक झालेली किंमत उघड झाली आहे. टोयोटा आधी मारुती सुझुकीच्या किंमती जाहीर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकते किंवा ते सर्व एकत्र करू शकते. नवीन अर्बन क्रूझर हायरायडरची किंमत ग्रँड विटाराच्या जवळपास असेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
Toyota Urban Cruiser Highrider दोन इंजिन पर्यायांसह येईल. हे 1.5-लिटर मारुती सुझुकी सोर्स्ड माइल्ड हायब्रीड इंजिनद्वारे समर्थित असेल, जे 100 Bhp ची शक्ती निर्माण करेल. दुसरे टोयोटाचे 1.5-लिटर तीन-सिलेंडर इंजिन असेल, जे 177.6 V लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येईल. हे इंजिन 114 bhp ची कमाल पॉवर जनरेट करेल.
गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि eCVT युनिट समाविष्ट आहे. Highrider फ्रंट-व्हील ड्राइव्ह असेल. पण यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह AWD प्रकाराचा पर्यायही मिळेल. टोयोटाचा दावा आहे की निओ ड्राइव्ह व्हेरियंट (माइल्ड हायब्रीड) सह 21.1 kmpl च्या मायलेज आणि हायब्रीड व्हेरियंटसह 27.9 kmpl चा सर्वोत्तम मायलेज आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Nissan Kicks आणि Maruti Suzuki Grand Vitara यांच्याशी होईल.
Highrider तीन हाय-एंड ट्रिममध्ये ऑफर केली जाते, यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, कनेक्टेड कार टेक, क्रूझ कंट्रोल आणि 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासह अनेक वैशिष्ट्यांसह येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, याला EBD सह ABS, सहा एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, वाहन स्थिरता नियंत्रण, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि बरेच काही मिळते.