Traffic Rule : देशात दररोज कित्येक अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर अनेकांना कायमचे अपंगत्व येते. या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. याच पार्श्वभूमीवर देशात वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत.
तरीही अनेकजण जाणूनबुजून हे नियम मोडतात. तर अनेकांना हे नियम माहिती नसतात. त्यामुळे त्यांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. समजा तुम्ही चारचाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला हा नियम माहिती असावा नाहीतर तुम्हाला देखील 10 हजारांचा दंड भरावा लागेल. जर तुम्हीही याकडे लक्ष दिले तर महागाईच्या काळात तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. दरम्यान, काय आहे हा नियम जाणून घ्या.

पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर भरावे लागेल 10 हजारांचे चलन
दिल्लीमधील सर्व खाजगी चारचाकी आणि दुचाकी किंवा व्यावसायिक कार, बस तसेच ट्रक, दुचाकी, पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांना PUC प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्ली परिवहन विभागाच्या माहितीनुसार, वाढलेल्या किमती सर्व प्रकारच्या वाहनांवर लागू असणार आहेत.
सध्या दिल्लीमध्ये प्रदूषण चाचणी केली नाही तर 10 हजार रुपयांचे चलन कापण्यात येते. या अगोदर 2011 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण चाचणीचे प्रमाण खूप वाढले होते. दिल्ली परिवहन विभागानेदेखील वाहन प्रदूषण चाचणीचे प्रमाण वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या दिल्लीमध्ये 950 पेक्षा जास्त प्रदूषण चाचणी केंद्रे उपलब्ध आहेत. प्रदूषण चाचणीसाठी दुचाकींना 60 रुपये आणि पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकींना 80 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना 100 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच 18% GST स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे.
परिवहन विभागाच्या मतानुसार, 2022 मध्ये 50 लाख दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र दिले आहे. याबाबत केंद्रचालकांनीही प्रदूषण चाचणीचे दर दीडशेवरून 300 रुपये करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल पंपावर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागत असल्याचे त्यांचे मत आहे.













