TVS Sport : फक्त 7 हजारात घरी न्या 73 kmpl चे दमदार मायलेज देणारी TVS Sport, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Published on -

TVS Sport : पेट्रोलच्या किमती जास्त झाल्यामुळे अनेकजण आता बाइक खरेदी करताना मायलेजला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हालाही चांगली मायलेज देणारी बाइक खरेदी करायची असेल आणि एकाचवेळी 70 ते 75 हजार रुपये खर्च करायचे नसल्यास तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे.

आता दमदार मायलेज आणि कमी किंमतीच्या बाइक्समध्ये बजाज प्लॅटिनाप्रमाणेच टीव्हीएस स्पोर्टचे देखील नाव प्रामुख्याने समोर येते. टीव्हीएस स्पोर्ट कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाइकपैकी एक असून बाजारामध्ये या बाइकची सर्वात जास्त पकड आहे.

या बाइकमध्ये 73 kmpl मायलेज मिळत आहे. या बाइकची किंमत 75 हजार रुपये आहे. परंतु जर तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही बाइक 7 हजार रुपयात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या बाईकची किंमत

जर किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून या बाईकच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 63,900 रुपये एक्स-शोरूम निश्चित करण्यात आली आहे. तर तिची ऑन-रोड किंमत रु.75,016 पर्यंत जात आहे. ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 75 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. समजा तुमचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्हाला उपलब्ध वित्त योजनांचा वापर करून ही बाईक रु.7,500 च्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येईल.

डाउन पेमेंट

ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 67,516 रुपये कर्ज मिळेल. यानंतर, तुम्हाला कंपनीकडे 7,500 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहे. बँक तुम्हाला ३ वर्षांच्या कालावधीसाठी 9.7 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक महिन्याला बँकेत 2,169 रुपयांचा EMI जमा करावा लागणार आहे.

जाणून घ्या इंजिन आणि पॉवरट्रेन

कंपनीच्या या बाइकमध्ये 109.7 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.29 PS कमाल पॉवर आणि 8.7 Nm पीक टॉर्क निर्माण करत आहे . हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. इतकेच नाही तर ARAI प्रमाणित मायलेज 73 kmpl मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe