Under 20 Lakh 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी कार निवडताना अनेकजण 7-सीटर कारचा पर्याय निवडत असतात. सध्या 7-सीटर कारच्या मागणीत मोठी वाढ झाली असून अनेक कार कंपन्या त्यांच्या नवीन 7-सीटर कार सादर करत आहेत.
तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम 7-सीटर कार खरेदी करायची असेल तर टाटा मोटर्स ते महिंद्रापर्यंतच्या अनेक 7-सीटर कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती देखील 20 लाखांपेक्षा कमी आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस
टोयोटा कार कंपनीकडून त्यांच्या आलिशान 7-सीटर कार भारतात सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टोयोटाची 7-सीटर कार खरेदी करायची असेल तर इनोव्हा हायक्रॉस कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
इनोव्हा हायक्रॉस एसयूव्ही कारमध्ये 2-लिटर पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर देखील देण्यात आली आहे. हे इंजिन ई-CVT गिअरबॉक्सशी जोडले आहे.
कारचे इंजिन 174 PS पॉवर आणि 205 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 16.13 Kmpl मायलेज देते. तर कारचे हायब्रीड इंजिन 23.24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 18.82 लाख रुपयांपासून सुरु होते.
महिंद्रा XUV700
महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची XUV700 एसयूव्ही कार भारतात लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये ग्राहकांना 7-सीटर पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह व्हेरियंट देखील उपलब्ध आहे. या फॅमिली कारची एक्स शोरूम किंमत 14.04 लाख रुपये आहे.
टाटा सफारी
टाटा मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या सफारी 7-सीटर कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आले आहे. या कारमध्ये 2-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. लवकरच कारमध्ये पेट्रोल इंजिन पर्याय देखील दिला जाणार आहे. कार 16.30 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम असून कारची एक्स शोरूम किंमत 16.19 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई अल्काझार
ह्युंदाई मोटर्सची अल्काझार 7-सीटर कार देखील तुमच्यासाठी उत्तम फॅमिली कार आहे. लवकरच या कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लाँच होणार आहे. कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन. कारची एक्स शोरूम किंमत 16.78 लाख रुपयांपासून सुरू होते.