Upcoming 7-Seater Car : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही जर नवीन 7 सीटर कार खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही या लेखात तुम्हाला बाजारात येणाऱ्या काही दिवसात एन्ट्री करणाऱ्या दमदार आणि बेस्ट 7 सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत.
ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट 7 सीटर कार खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येत्या काही दिवसात मारुती सुझुकी आणि टोयोटा सारख्या लोकप्रिय कंपन्यांचा 7 सीटर कार्स बाजारात दाखल होणार आहे. चला मग जाणून घेऊया बाजारात येत्या काही दिवसात कोणत्या कोणत्या नवीन 7 सीटर कार एन्ट्री करणार आहे.
Maruti Suzuki Engage
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मारुती सुझुकी एंगेज हे ब्रँडच्या लाइन-अपमधील नवीन फ्लॅगशिप मॉडेल असेल. प्रीमियम MPV चे लॉन्च जुलै 2023 मध्ये होणार आहे आणि मारुतीच्या Nexa डीलरशिपद्वारे विकले जाईल. या 4-व्हीलरमध्ये, TNGA-C प्लॅटफॉर्मपासून पॉवरट्रेनपर्यंत सर्व काही आणि फीचर्स इनोव्हा हायक्रॉस सारखे आढळतील.
तसेच एक्सटीयर डिझाइनमध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात तर बदललेला सुझुकी लोगो वगळता इंटीरियर सारखा मिळणार आहे. यात 2.0 लीटर एनए पेट्रोल इंजिन आणि 2.0 लीटर मजबूत हायब्रिड युनिट पॉवरट्रेन मिळेल.
Toyota MPV
मारुती सुझुकी एर्टिगाचे रीबॅजेड व्हेरिएंट Rumion लवकरच लॉन्च होणार आहे. तो लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. टोयोटा आधीच दक्षिण आफ्रिकेत रुमियन विकते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रुमियान 2023 च्या उत्तरार्धात वेगळ्या नावाने बाजारात लॉन्च केले जाईल. हे मॉडेल मारुती अर्टिगा सारखेचअसणार आहे. मात्र, डिझाइनच्या दृष्टीने बदल अपेक्षित आहेत. यात नवीन फ्रंट ग्रिल, नवीन इंटीरियर कलर थीम आणि अपहोल्स्ट्री मिळेल. या 7-सीटर MPV ला 1.5-लिटर K15C इंजिन मिळते, जे 103 bhp पॉवर आणि 138 Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी कनेक्ट केले जाईल.
New-gen Kia Carnival
2023 ऑटो एक्स्पोमध्ये शोकेस केलेला नवीन-जनरल Kia कार्निवल KA4 नेमप्लेटसह भारतीय बाजारपेठेत येईल. हे प्रीमियम MPV चे चौथ्या जनरेशचे मॉडेल आहे. हे 2021 मध्ये जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले. बदलांबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी या कारला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतो, जे आउटगोइंग मॉडेलपेक्षा लांब व्हीलबेस देते.
हे पण वाचा :- Ration Card: रेशनकार्ड धारकांना धक्का! नव्या यादीत ‘या’ लोकांची नावे होणार कट; जाणून घ्या नेमकं कारण