Upcoming Car : जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर देशभरात वाहन खरेदीला वेग आला आहे. सरकारने 22 सप्टेंबर पासून जीएसटी 2.0 ची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे छोट्या गाड्यांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली असून अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होत आहे. चार मीटर पेक्षा कमी आकाराच्या गाड्या सरकारच्या निर्णयानंतर स्वस्त झाल्या आहेत.
अशातच आता नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. भारतीय कार मार्केट मध्ये लवकरच एका लोकप्रिय गाडीचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्यात येणार आहेत. रेनो कंपनी आपली लोकप्रिय हॅचबॅक क्विडचे फेसलिफ्ट व्हर्जन येत्या काळात लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीचे डिझाइन व आतील इंटीरियर हे युरोपमधील एका लोकप्रिय EV कार्सवर आधारित राहणार आहे. रेनोच्या या नव्या फेसलिफ्ट कारची लॉन्चिंग नवीन जीएसटी रेट लागू झाल्यानंतर होणार असल्याने याची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत चार लाख रुपये राहू शकते. नव्या गाडीत पुढील बाजूस Y-आकाराचे LED डीआरएल्स, पेंटागोनल हॅलोजन हेडलॅम्प्स व क्लोज ग्रिल डिझाइन दिली जाणार आहे. गाडीच्या बॉडीवर चौकोनी व्हील आर्च, जाड क्लॅडिंग तसेच फ्लॅप-स्टाईल डोअर हॅन्डल्स राहतील.
गाडीला हलक्या उताराची रूफलाइन असेल. थोडक्यात ही गाडी पूर्णपणे नव्या रूपात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. मध्यमवर्गीय लोकांना डोळ्यापुढे ठेवून ही गाडी डिझाईन करण्यात येत आहे. या गाडीचे स्पोर्टी लुक तरुणांना आकर्षित करणार आहेत.
गाडीच्या पाठीमागे Y-आकाराचे टेललॅम्प्स आणि त्यांना जोडणारा जाड ट्रिम असेल. याच्या मध्यभागी कंपनीचा लोगो राहील. या बदलांमुळे ही गाडी फारच युनिक दिसणार आहे. इंटीरियरमध्ये पण आपल्याला अनेक आधुनिक फीचर्स दिसतील.
10-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, नवीन डिझाइनचा स्टीयरिंग व्हील व अंदाजे 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा बेसिक पण गरजेच्या वैशिष्ट्यांमुळे ही गाडी उठावदार राहील. यात इतर आधुनिक फीचर्सही दिले जातील.
पण गाडीच्या इंजिन मध्ये फारसा बदल होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गाडीचे इंजिन आधीच्या मॉडेल सारखेच राहणार आहे. ही फेसलिफ्ट गाडी सीएनजी व्हर्जन मध्ये सुद्धा येऊ शकते. पण गाडीमध्ये सीएनजी किट इनबिल्ड राहणार नाही.
गाडी सीएनजी करण्यासाठी डीलरशिपवर पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. याच्या सीएनजी किटची किंमत सुमारे 75,000 रुपये असू शकते. यावर कंपनीकडून स्टॅंडर्ड वॉरंटी सुद्धा मिळेल. या गाडीचे पेट्रोल व्हेरियंट चार लाख रुपये व सीएनजी व्हेरियंट पावणे पाच लाख रुपयांमध्ये मिळेल. पण ही एक्स शोरूम किंमत राहील.