Upcoming Car In India : नजिकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात अलीकडे एसयूव्ही कारची डिमांड वाढली आहे. तरुण वर्गात एसयूव्ही कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. एसयुव्ही कारचे डिझाईन अन दमदार फीचर्स नवयुवक तरुणांना विशेष आकर्षित करत आहेत. मात्र असे असले तरी आजही भारतीय मार्केटमध्ये हॅचबॅक कारचा बोलबाला आहे.
या सेगमेंटमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या गाड्या लॉन्च केल्या आहेत. मारुती सुझुकी डिजायर, टाटा अल्ट्रोज, मारुती सुझुकी बलेनो या काही लोकप्रिय गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान, जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये आता आणखी विकल्प पाहायला मिळणार आहे.
कारण की ह्युंदाई, टाटा आणि सिट्रोएन कंपनी लवकरच नवीन हॅचबॅक कार लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे. लवकरच भारतीय कार बाजार तीन नवीन कार लॉन्च होणार आहेत. दरम्यान आता आपण भारतीय कार मार्केटमध्ये कोणत्या तीन नवीन कार लॉन्च होणार याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट : Hyundai ही एक दिग्गज ऑटो कंपनी असून या कंपनीचे अनेक मॉडेल आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. i20 ही कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. या गाडीची लोकप्रियता पाहता ह्युंदाई कंपनीने याचे फेसलिफ्ट मॉडेल देखील बाजारात लॉन्च केले आहे. ग्राहकांना Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट देखील आवडली असून या कारची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
दरम्यान आता कंपनी याचे आणखी एक वर्जन लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता कंपनी i20 N Line ची फॅसीलिटी व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना या आगामी Hyundai i20 N Line फेसलिफ्टच्या बाह्य आणि आतील भागात मोठे बदल दिसणार आहेत.
Citroen C3 Turbo AT : फ्रेंच कार निर्माता Citroen भारतीय. Citroen ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता कंपनी लवकरच भारतीय कार बाजारात एक नवीन कार घेऊन येणार आहे. कंपनी आपल्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक C3 मध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
आगामी Citroen C3 Turbo Automatic ला पॉवरट्रेन म्हणून 1.2-लीटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत आगामी कारची किंमत 1.20 लाख रुपयांनी जास्त असू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
टाटा अल्ट्रोझ रेसर : भारतातील टाटा ही ऑटो कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल लॉन्च करत असते. टाटाच्या गाड्या ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. कंपनीची अल्ट्रोज ही देखील एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. दरम्यान, कंपनी लवकरच एक नवीन कार लॉन्च करणार असे वृत्त समोर आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात कंपनी टाटा अल्ट्रोज ही हॅचबॅक कार लॉन्च करू शकते. नवी दिल्ली येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये, कंपनीने आपल्या आगामी टाटा अल्ट्रोझ रेसरची संकल्पना आवृत्ती प्रदर्शित केली होती. यामुळे ही कार पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकते असा दावा होत आहे.