कार विकत घ्यायची आहे का ? मग पैसे तयार ठेवा, ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणार ‘या’ 3 नवीन कार

Tejas B Shelar
Published:
Upcoming Car Launching

Upcoming Car Launching : तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या फेस्टिव्ह सीजन मध्ये काही ऑटो कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत. यामध्ये टाटा आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्यांचा देखील समावेश आहे. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या फेस्टिव सीझनमध्ये अर्थातच सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला बाजारात काही नवीन ऑप्शन पाहायला मिळणार आहेत.

खरंतर, भारतात दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहनांची विक्री वाढत असते. भारतीय संस्कृतीत दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा सणांना नवीन वाहन खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. यामुळे या सणासुदीच्या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होते.

हेच कारण आहे की यंदाच्या फेस्टिव सिझनमध्ये टाटा महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्या नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आज आपण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात कोणत्या 3 कार भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

महिंद्रा रॉक्स : महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही स्वदेशी कंपनी दरवर्षी नवनवीन मॉडेल भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करत असते. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यातही कंपनी एक नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ही एक ऑफ-रोडिंग SUV राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 5-दरवाजा असणारी महिंद्रा थार लाँचं करणार आहे.

ही आगामी 5-दरवाजा महिंद्रा थार कंपनीच्या 3-दरवाजा थारची अद्ययावत आवृत्ती आहे, जिचे नाव महिंद्रा थार रॉक्स असे ठेवण्यात आले आहे. कंपनी १५ ऑगस्टला महिंद्रा थार रॉक्स लाँच करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. पण, या आगामी महिंद्रा थार रॉक्सच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

सायट्रोन बेसाल्ट : महिंद्रा प्रमाणेच सायट्रोन कंपनी देखील पुढील महिन्यात आपल्या एका नवीन कारचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात या कारचे अनावरण होईल आणि यानंतर याच्या किमती समोर येणार आहेत. ही कंपनीची एक नवीन क्रॉसओवर एसयूव्ही राहणार आहे.

सिट्रोएन बेसाल्ट हे या क्रॉसओवर एसयूव्हीचे नाव राहणार आहे. कंपनी 2 ऑगस्ट रोजी प्रोडक्शन-स्पेस सिट्रोएन बेसाल्ट प्रदर्शित करणार आहे. यानंतर कंपनी कारच्या किंमती जाहीर करणार आहे. अर्थातच लवकरच इंडियन कार मार्केटमध्ये या गाडीची देखील लॉन्चिंग होणार आहे.

Tata Curvv : टाटा मोटर्स ही भारतातील एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीवर ग्राहकांचा मोठा गाढा विश्वास आहे. टाटा कंपनीच्या कार्स खूपच सेफ्टी असतात असा दावा स्वतः ग्राहकही करतात.

दरम्यान, जर तुम्हीही टाटा कंपनीची नवीन एसयूव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज समोर आली आहे. कंपनी पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात Tata Curvv Suv लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. सर्वप्रथम ही गाडी इलेक्ट्रिक मॉडेल मध्ये लॉन्च होणार आहे. यानंतर मग आयसीई मॉडेल लॉन्च केले जाणार आहे.

ही गाडी सात ऑगस्टला लॉन्च होणार अशी माहिती कंपनीकडून प्राप्त झाली आहे. यामुळे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच बजेट तयार करावा लागणार आहे. ही इलेक्ट्रिक गाडी एकदा चार्ज केल्यानंतर सहाशे किलोमीटर पर्यंत धावणार असा दावा कंपनीने केला आहे. या अपकमिंग इलेक्ट्रिक कारची किंमत 17 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe