पैसे तयार ठेवा ! भारतीय कार बाजारात लवकरच लाँच होणार ‘या’ 4 नवीन SUV कार

Updated on -

Upcoming SUV Car : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना हायब्रीड SUV कार खरेदी करायची आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हायब्रीड कारला मोठी मागणी आली आहे. यामुळे कंपन्यांच्या माध्यमातून आता हायब्रीड कार उत्पादित करण्याला अधिक महत्त्व दाखवले जात आहे.

अनेक दिग्गज कंपन्या आता हायब्रीड कार बनवण्यात व्यस्त आहेत. खरे तर हायब्रीड कारच्या किमती या इतर कार पेक्षा अधिक आहेत. मात्र असे असतानाही ग्राहक मोठ्या प्रमाणात हायब्रीड कार खरेदीला प्राधान्य दाखवत आहेत. हेच कारण आहे की नजीकच्या भविष्यात भारतीय कार बाजारात काही दिग्गज ऑटो कंपन्या नवीन हायब्रीड कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय कार बाजारात चार नवीन हायब्रीड कार लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण नजीकच्या भविष्यात कोणत्या चार नवीन हायब्रीड एसयुव्ही कार लॉन्च होणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. दरम्यान मारुती सुझुकीच्या माध्यमातून लवकरच आपल्या लोकप्रिय ग्रँड विटाराचे 7-सीटर मॉडेल भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च केले जाऊ शकते असे वृत्त समोर आले आहे. ही गाडी पुढील वर्षी अर्थातच 2025 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च होणार असा अंदाज आहे.

या आगामी 7 सीटर मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये अनेक कॉस्मेटिक बदल पाहायला मिळणार असा दावा केला जात आहे. ही एक हायब्रीड कार राहणार आहे. कारला पॉवरट्रेन म्हणून 1.5-लीटर सौम्य हायब्रिड पेट्रोल आणि 1.5-लीटर मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

टोयोटा हायराइडर : जपानी कंपनी टोयोटा लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये धमाका करणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर कंपनी 2025 च्या पहिल्या सहामाहीत आपल्या लोकप्रिय SUV Hyryder ची 7-सीटर मॉडेल लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

आगामी 7-सीटर टोयोटा हायरायडरमध्ये देखील अनेक कॉस्मेटिक बदल केले जातील असा दावा केला जात आहे. कंपनीच्या माध्यमातून भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च केली जाणारी ही कार हायब्रीड राहणार आहे. कारमध्ये 1.5-लीटर सौम्य हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिन पॉवरट्रेन म्हणून प्रदान केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टोयोटा फॉर्च्युनर : Toyota Hyryder शिवाय कंपनी आणखी एक कार येत्या काही महिन्यात भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय फॉर्च्यूनर कारचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करणार आहे. हे मॉडेल हायब्रीड राहणार आहे. टोयोटा फॉर्च्युनरचे माइल्ड हायब्रीड वर्जन पुढील वर्षी भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.

फॉर्च्यूनर ही भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय फुलसाईज एसयूव्ही आहे. कंपनीची ही सर्वाधिक लोकप्रिय कार असून या गाडीची लोकप्रियता पाहता आता कंपनीच्या माध्यमातून या कारचे माईल्ड हायब्रीड वर्जन लॉन्च केले जाणार आहे. या आगामी कारला पॉवरट्रेन म्हणून 48-व्होल्ट सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.8-लिटर डिझेल इंजिन प्रदान केले जाईल, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.

मारुती सुझुकी Fronx : मारुती सुझुकी कंपनीचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. असेच एक लोकप्रिय मॉडेल आहे मारुती सुझुकी Fronx. या गाडीला ग्राहकांनी भरभरून असे प्रेम दाखवले आहे. या गाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता कंपनीच्या माध्यमातून पुढील वर्षी Fronx चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केले जाणार आहे. यासाठी कंपनीच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या आगामी अपडेटेड एसयूव्हीच्या आतील आणि बाहेरील भागात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याशिवाय ग्राहकांना कारमध्ये पॉवरट्रेन म्हणून मजबूत हायब्रिड इंजिनचा पर्यायही मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe