Upcoming SUV Feature And Price : इंडियन कार मार्केटमध्ये सर्वाधिक कार विक्री करण्याचा किताब मारुती सुझुकी या कंपनीकडे आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीनंतर सर्वाधिक कार विक्री करण्याचा बहुमान ह्युंदाई या कंपनीला जातो. ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून लवकरच कंपनी आपली नवीन गाडी भारतीय कार बाजारात लॉन्च करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार क्रेटा फॅसिलेक्ट या फेसलिफ्ट वर्जनच्या यशामुळे गदगद झालेल्या ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून आता आपल्या आणखी एका लोकप्रिय मॉडेलचे फेसलिफ्ट वर्जन भारतीय कार बाजारात लॉन्च केले जाणार आहे.

Hyundai Alcazar या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या SUV चे Facelift वर्जन कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. ही अपकमिंग एसयूव्ही दोन प्रकारच्या आसन व्यवस्थांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. 6 सीटर आणि 7 सीटर या दोन कॉन्फिगरेशन मध्ये हे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च होणार आहे.
या नव्याने दाखल होणाऱ्या फेसलिफ्ट वर्जन मध्ये अनेक मूलभूत बदल होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. या गाडीचे इंटेरियर आणि एक्सटेरियर मोठ्या प्रमाणात बदलू शकते असा दावा होत आहे. लॉन्चिंग बाबत बोलायचं झालं तर ही गाडी येत्या काही दिवसांनी ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात या गाडीची लॉन्चिंग होऊ शकते असा दावा होत आहे.
तथापि कंपनीच्या माध्यमातून या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत अपडेट हाती आलेली नाही यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत हे कंपनीचे फेसलिफ्ट वर्जन भारतीय बाजारात लॉन्च होणार का हे पाहण्यासारखे राहील. दरम्यान आता आपण या गाडीत नेमके काय खास राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी राहणार Hyundai Alcazar Facelift
Hyundai Alcazar फेसलिफ्टच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या गाडीची ग्राहकांना आतुरता लागली आहे. आता मात्र ही गाडी येत्या काही दिवसांनी ग्राहकांच्या भेटीला येणार असे दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या नव्याने लॉन्च होणाऱ्या SUV च्या इंटेरियर आणि एक्सटेरियर मध्ये मूलभूत बदल पाहायला मिळू शकतो.
इंटेरियर बाबत बोलायचं झालं तर यात 10.25-इंच स्क्रीन, लेव्हल-2 ADAS, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरामिक सनरूफ आणि हवेशीर आसनांचा समावेश असू शकतो. पण या आगामी काळात लॉन्च होणाऱ्या SUV च्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
Alcazar फेसलिफ्टमध्ये आपल्या मूळ मॉडेल प्रमाणेच 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन प्रदान केले जाऊ शकते. जे की, 160bhp ची कमाल शक्ती आणि 253Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम राहणार असा दावा केला जात आहे.
तसेच कार 1.5-लीटर डिझेल इंजिनसह सुसज्ज असेल जी जास्तीत जास्त 116bhp पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये येणार आहे. या गाडीच्या डिझाईन मध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतात.
या गाडीची डिझाईन क्रेटा प्रमाणे राहू शकते. किमती बाबत बोलायचं झालं तर सध्याच्या मॉडेल पेक्षा नवीन फॅसिलिफ्ट मॉडेलची किंमत काहीशी अधिक राहणार आहे. किंमत नेमकी किती राहणार याबाबत आगामी काळात योग्य माहिती मिळणारचं आहे.













