Upcoming SUV : तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची आहे का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
भारतात एसयूव्ही सेगमेंटच्या गाड्यांची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सेगमेंटमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.

अशातच आता नवीन एसयूव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी काही विकल्प उपलब्ध होणार आहेत कारण की पुढील दोन आठवड्यात भारतात दोन नवीन मिड साईज एसयूव्ही अधिकृतपणे लाँच केल्या जातील.
दरम्यान आता आपण पुढील दोन आठवड्यात कोणत्या कंपन्या मिड साईज SUV लॉन्च करणार याबाबतची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दोन आठवड्यात 2 नवीन एसयूव्ही लाँच होणार!
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन आठवड्यात मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील दोन नवीन एसयूव्ही लाँच केल्या जाणार आहेत.
यातील एक आयसीई सेगमेंटमध्ये आणि दुसरी ईव्ही सेगमेंटमध्ये राहणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स भारतात टाटा सिएरा आणि महिंद्रा एक्सईव्ही 9 एस लाँच करणार आहे.
महिंद्रा XEV 9S कधी लाँच होईल ? : महिंद्रा कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कंपनी XEV 9S हे मॉडेल 27 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. ही SUV इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लाँच केली जाईल.
या गाडीमध्ये अनेक नवनवीन फीचर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लाँच होण्यापूर्वी, महिंद्रा ने या SUV चे अनेक टीझर रिलीज केले आहेत, ज्यामध्ये तिच्या डिझाइनपासून फीचर्स पर्यंत बऱ्याच गोष्टी आधीच समोर आल्या आहेत.
टाटा सिएरा कधी लाँच होणार? : टाटा मोटर्स भारतात मध्यम आकाराच्या एसयूव्ही म्हणून नवीन पिढीची टाटा सिएरा पुन्हा लाँच करणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी सुरुवातीच्या लाँचनंतर,
ही एसयूव्ही 25 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. ती पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल आणि पाच-सीट कॉन्फिगरेशनसह ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.












