Upcoming SUV : भारतीय बाजारपेठेत सध्या SUV कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता वेगवेगळ्या कंपन्या नवनवीन SUV लाँच करत आहेत. आता आगामी जून महिन्यामध्ये 3 शक्तीशाली एसयूव्ही कार्स लाँच होणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार तुमच्या बजेटमध्ये असणार आहेत त्यामुळे तुम्ही त्या कमी किमतीत खरेदी करू शकता. या SUV मध्ये मारुती सुझुकी जिमनी, Hyundai Exter आणि होंडा एलिव्हेट या SUV चा समावेश असणार आहे.
मारुती सुझुकी जिमनी:
मारुती सुझुकीने बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित मॉडेल मारुती जिमनी लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी येत्या 7 जून रोजी मारुती जिमनीच्या किंमती जाहीर करेल. कारच्या फीचर्सचा तपशील यापूर्वी समोर आला आहे. कंपनीकडून ही SUV मागील ऑटो एक्स्पो दरम्यान सादर करण्यात आली होती आणि तर त्या वेळी तिची अधिकृत बुकिंगही सुरू झाली आहे.
यात, कंपनीकडून 1.5-लिटर के-सीरीज नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 103 bhp ची मजबूत पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात आलेले आहे.
जोपर्यंत मायलेजचा संबंध आहे, मॅन्युअल ट्रान्समिशनसह, जिमनीला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ने 16.94 kmpl मायलेज देण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, ऑटोमॅटिक वेरिएंटसाठी, असा दावा करण्यात आला आहे की हे मॉडेल 16.39 किमी प्रति लिटर पेट्रोलचा वापर करू शकते.
अपेक्षित लॉन्च तारीख : जून 7
अपेक्षित किंमत: 10 ते 12 लाख रुपये
Hyundai Exter :
Hyundai आपली आगामी SUV Hyundai Exter 10 जुलै 2023 रोजी भारतात लॉन्च करू शकते. कंपनीकडून आतापर्यंत वेगवेगळ्या टीझर्समध्ये Xeter ची रचना अंशतः दर्शविली असून तिचे पॉवरट्रेन लाइन-अप आणि काही फीचर्स उघड केली आहेत. भारतीय बाजारपेठेत ही एसयूव्ही कंपनीच्या लाइनअपमधील सर्वात लहान तसेच परवडणारी एसयूव्ही असणार आहे.
यामध्ये देण्यात आलेला सनरूफ आवाज-सक्षम असून यात सनरूफ ‘ओपन सनरूफ’ किंवा ‘मला आकाश पाहायचे आहे’ सारख्या आदेशांना तात्काळ प्रतिसाद देते. इतकेच नाही तर फुल एचडी व्हिडिओ रिझोल्यूशनसह येत असणाऱ्या डॅशकॅममध्ये फ्रंट आणि रियर कॅमेरे, 2.31-इंच एलसीडी डिस्प्ले, स्मार्टफोन अॅप-आधारित कनेक्टिव्हिटी आणि एकाधिक रेकॉर्डिंग मोड प्रदान करण्यात आले आहेत.
हे कॅमेरे कारच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूंच्या स्थितीवर लक्ष ठेवेल. Hyundai Exter एकूण पाच प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार आहे, ज्यात EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect हे टॉप मॉडेलचा समावेश आहे.
या मध्ये, कंपनी 1.2-लीटर काप्पा पेट्रोल इंजिन वापरणार आहे, जे तुम्ही Grand i10 Nios, i20 आणि Venue सारख्या मॉडेल्समध्ये पाहिले आहे. जरी याच्या पॉवर आउटपुटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, परंतु असे मानले जाते की ते 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही एसयूव्ही कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्ये देणार आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
अपेक्षित लॉन्च तारीख : 10 जुलै
अपेक्षित किंमत: 6 ते 6.5 लाख रुपये
होंडा एलिव्हेट:
Honda Elevate चे जागतिक पदार्पण भारतातून होत असून Elevate mid-size SUV हे Honda चे सिटी मिड-साईज सेडान आणि Amaze कॉम्पॅक्ट सेडान नंतरचे हे कंपनीचे तिसरे मॉडेल असणार आहे. कंपनी येत्या 6 जून रोजी आपली नवीन SUV Honda Elevate सादर करेल. कंपनीकडून याचा आणखी एक नवीन टीझर रिलीज केला असून यात एसयूव्हीचे छप्पर दिसत आहे. एकदा बाजारात आल्यावर SUV प्रामुख्याने Hyundai Creta ला टक्कर देऊ शकते.
कंपनी पॅनोरामिक सनरूफऐवजी सिंगल-पेन सनरूफ देत असून क्रेटा आणि ग्रँड विटारा सारख्या प्रतिस्पर्धी मॉडेल्सना पॅनोरामिक सनरूफचा पर्याय दिला जात आहे. Honda Elevate लाँच करणारी भारत ही पहिली बाजारपेठ असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर क्षमतेचे 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरेल.
परंतु त्याचे पॉवर आउटपुट ट्यूनिंगवर अवलंबून असणार आहे. परंतु सहसा हे इंजिन 121hp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करू शकते. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाईल.
अपेक्षित लॉन्च तारीख : 6 जून
अपेक्षित किंमत: 10 ते 10.50 लाख रुपये