Upcoming SUV List : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतीय कार बाजारात सेडान कारच्या तुलनेत एसयुव्ही कारला अधिक पसंती दाखवली जात आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडयांना भारतीय कार बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आता कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या प्रोडक्शनला चालना दिली आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा सेगमेंट हा खूपच स्ट्रॉंग बनत चालला आहे. या सेगमेंटमध्ये विविध कंपन्यांच्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. टाटा नेक्सॉन, टाटा पंच आणि मारुती ब्रेझा सारख्या टॉप सेलिंग कार याच सेगमेंटचा भाग आहेत.
या सेगमेंटच्या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे या मागणीची दखल घेत आता अनेक ऑटोमेकर्स या सेगमेंटमध्ये नवीन उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नजीकच्या भविष्यात या सेगमेंट मध्ये आणखी 2 नवीन कार लॉन्च होणार आहेत. दरम्यान आज आपण याच अपकमिंग एस यु व्ही कारची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
New Gen Hyundai Venyu : ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटो मेकर कंपनी आहे. ही कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांसाठी आपल्या एका लोकप्रिय कारचे New Generation मॉडेल लॉन्च करणार आहे.
कंपनी ह्युंदाई वेन्यू या कारचे न्यू जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे. आगामी 2025 Hyundai Venyu या कॉम्पॅक्ट SUV चा कोडनेम Q2Xi हा आहे. ही अपकमिंग कार त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अद्ययावत राहणार असा दावा केला जात आहे.
या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीचे डिझाईन Palisade आणि Creta फेसलिफ्टसारखे राहणार असे म्हटले जात आहे. ही गाडी 2025 मध्ये म्हणजेच पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होणार आहे.
Kia Syros : Kia ऑटो कंपनी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आणखी एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडी समाविष्ट करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ही कंपनी Syros ही नवीन SUV भारतात लॉन्च करणार आहे. यां नव्याने लॉन्च होणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडीची किंमत सुमारे 11 लाख रुपये राहील अशी शक्यता आहे.
ही गाडी क्लॅव्हिस म्हणून ओळखली जात होती, परंतु आता किआने ट्रेडमार्क मिळवल्यानंतर याला Syros हे नाव दिले जाणार आहे. तथापि, सायरोसच्या ईव्ही आवृत्तीला क्लॅव्हिस हे नाव दिले जाऊ शकते.