Upcoming SUV : तुम्हाला ह्युंदाई क्रेटा खरेदी करायची असेल पण तुमच्याकडे तेवढा पैसा उपलब्ध नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. Citroen कंपनीने एक नवीन एसयूव्ही लॉन्च केली आहे. यामुळे जर तुम्हालाही कमी किमतीत SUV खरेदी करायची असेल तर ही नव्याने लाँच झालेली गाडी तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
या नव्या SUV मुळे भारतीय एसयूव्ही बाजारात आणखी एका फ्रेंच फ्लेवरची इंट्री झाली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सिट्रोएन इंडियाने त्यांची नवीन एसयूव्ही, एअरक्रॉस X नुकतीच लाँच केली आहे. ही गाडी आकर्षक लूक व शक्तिशाली इंजिनसह सुसज्ज आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मध्यमवर्गीयांना डोळ्यापुढे ठेवून कंपनीने गाडीची किंमत सुद्धा बजेटमध्ये आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 8.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या सिट्रोएन 2.0 “शिफ्ट इनटू द न्यू” स्ट्रॅटेजी अंतर्गत हे तिसरे मॉडेल इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
यापूर्वी, कंपनीने C3X व बेसाल्ट एक्स गाडी लाँच केले होते. कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या SUV मध्ये भन्नाट फिचर्स आहेत. इंटीरियर सुद्धा अपग्रेड करण्यात आलंय. या नवीन एसयूव्हीला एक प्रीमियम टच देण्याचा प्रयत्न झाला आहे.
कंपनीच्या या SUV मध्ये नवीन डीप फॉरेस्ट ग्रीन रंग व टेलगेटवर ‘X’ बॅजिंग देण्यात आली आहे. इंटेरियर मध्ये मात्र भरपूर बदल झाले आहेत. एसयूव्हीच्या केबिनला अपग्रेड करण्यात आलंय. गाडीत सॉफ्ट-टच लेदरेट रॅपिंग, बेझल-लेस 10.25-इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व सोनेरी अॅक्सेंट अशा गोष्टी आहेत.
शिवाय, एसयूव्हीमध्ये रीडिझाइन केलेले गियर लीव्हर, व्हेंटिलेटेड लेदरेट सीट्स, फूटवेल लाइटिंग सुद्धा आहेत. त्यामुळे ही गाडी पूर्णपणे प्रीमियम फील देते. गाडीची किंमत 8.29 लाखांपासून सुरू होते. तसेच गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 13.49 लाख (एक्स शोरूम) आहे.