Upcoming SUV : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. दरम्यान नव्या वर्षाच्या मुहूर्तावर आपल्यापैकी अनेक जण नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असतील. आता तुमची पण तशीच तयारी असेल आणि तुम्ही SUV घेण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी समोर आली आहे.
कारण की 2026 या नव्या वर्षाची सुरुवात फारच धमाकेदार होणार आहे. जानेवारी 2026 हा महिना भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर साठी फारच गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे कारण की या महिन्यात काही कंपन्या आपल्या नवीन एसयुव्ही लॉन्च करणार आहेत.

जानेवारी महिन्यात तीन नवीन SUV ग्राहकांसाठी लॉन्च होतील अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या 3 नवीन एसयूव्ही लॉन्च होणार आहेत याची माहिती आलेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मारुती सुझुकी ई विटारा : मारुती सुझुकी जानेवारीमध्ये मोठा धमाका करणार आहे. कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, ई-विटारा देखील लाँच करणार असे वृत्त समोर आले आहे. ही कार हार्टेक्ट-ई प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
ही कार 49 किलोवॅट प्रति तास आणि 61 किलोवॅट प्रति तास बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ही एसयूव्ही एका चार्जवर 543 किमीची रेंज देणार असा दावा कंपनीने केला आहे.
यात लेव्हल-2 एडीएएस, मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, एचयूडी आणि अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये असतील. गाडीच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण जानेवारी महिन्यात ही गाडी ग्राहकांसाठी लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.
रेनॉल्ट डस्टर : रेनॉल्ट डस्टर पुन्हा एकदा वापसी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होईल. 26 जानेवारी 2026 रोजी रेनॉल्ट डस्टर पुन्हा एकदा लॉन्च होणार असून
या नव्या डस्टर मध्ये अनेक नवीन बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. नवीन डस्टर सीएमएफ-बी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामध्ये फक्त भारतीय परिस्थितीला सूट होतील असे अनेक बदल असतील. सुरुवातीला, ही गाडी पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाईल, परंतु नंतर हायब्रिड आवृत्ती जोडली जाऊ शकते.
महिंद्रा एक्सयूव्ही 7XO : महिंद्रा अँड महिंद्रा पण नवीन वर्ष गाजवण्यासाठी सज्ज आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन SUV सादर करण्यास सज्ज झाली आहे. 5 जानेवारी 2026 रोजी कंपनी त्यांची नवीन XUV 7XO सादर करणार आहे.
सध्याच्या XUV700 चीच एक मोठी आणि अधिक प्रगत अपडेट म्हणून ही गाडी ओळखली जाणार आहे. नव्या गाडीची रचना महिंद्राच्या नवीन EV श्रेणीपासून प्रेरित राहणार आहे.
यात 540-डिग्री कॅमेरा, ADAS व्हिज्युअलायझेशन आणि अनेक नवीन सेफ्टी फीचर्स राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या टेक्नॉलॉजीमध्ये ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेत फार पुढे राहणार आहे.