Valentine Day Offer: संधी सोडू नका ! ‘इतक्या’ भन्नाट डिस्काउंटसह खरेदी करा ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर

Ahmednagarlive24 office
Published:

Valentine Day Offer: तुम्ही देखील स्वस्तात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंट ऑफरसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरवर 12,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट ओकिनावा कंपनीने जारी केला आहे. ओकिनावा व्हॅलेंटाईन डे असं या ऑफरला नाव देण्यात आला आहे. हे लक्षात ठेवा ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारीपर्यंत वैध असेल.या ऑफर अंतर्गत तुम्ही iPraise+, PraisePro आणि Ridge+, R30 आणि Lite स्कूटर खरेदी करू शकतात. चला मग डिस्काउंटसह उपलब्ध असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज आणि टॉप स्पीडचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया .

Okinawa R30

Okinawa R30 ची किंमत 61,998 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीचा दावा आहे की, एका चार्जिंगवर ही स्कूटर 25 किलोमीटर प्रति तासाच्या टॉप स्पीडसह 60 किलोमीटरची रेंज देते.

Okinawa Ridge+

Okinawa Ridge Plus ची सुरुवातीची किंमत 76,285 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कूटरला पूर्ण चार्ज केल्यावर, कंपनी 84 किलोमीटरच्या रेंजचा दावा करते आणि या रेंजसह, 45 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.

Okinawa Praise Pro

Okinawa Praise Pro ची सुरुवातीची किंमत 99,645 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर 58 किमी प्रतितासच्या टॉप स्पीडसह एका चार्जवर 88 किमीची रेंज देते.

Okinawa iPraise+

Okinawa iPrice Plus ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1.46 लाख रुपये आहे. या स्कूटरची राइडिंग रेंज 139 किमी आहे आणि त्याचा टॉप स्पीड 58 किमी आहे.

Okinawa Lite

Okinawa Lite स्कूटरची किंमत दिल्लीत रु. 66,993 पासून खरेदी केली जाऊ शकते. स्कूटरची रेंज एका चार्जमध्ये 60 किलोमीटर आहे आणि त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.

महत्त्वाची माहिती

ओकिनावा व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी, कृपया कंपनीच्या वेबसाइटवर किंवा जवळच्या ओकिनावा डीलरशिपला भेट देऊन सवलत ऑफरचे तपशील तपासा कारण सूट ऑफर मॉडेल आणि व्हेरियंटनुसार बदलू शकते.

हे पण वाचा :-  Upcoming Sedan Car: सेडान कार खरेदी करणार असाल तर थांबा ! बाजारात येत आहे ‘ह्या’ 4 दमदार कार्स ; लिस्ट पाहून व्हाल थक्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe