Volvo C40 Recharge : लाँच झाली ‘ही’ शक्तिशाली इलेक्ट्रिक कार, मिळेल 530Km रेंज आणि 413 लीटर बूट स्पेस; किंमत असेल..

Published on -

Volvo C40 Recharge : भारतीय बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्यापासून इलेक्ट्रिक वाहने लाँच होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण एक शक्तिशाली इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल झाली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला 530Km रेंज आणि 413 लीटर बूट स्पेस पाहायला मिळेल. जी अवघ्या 27 मिनिटांत चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. Volvo ने आपली Volvo C40 Recharge ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. सुरुवातीची किंमत 61.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.

Volvo

आजपासून या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे बुकिंगही सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपवरून तुम्हाला ही शानदार एसयूव्ही बुक करता येईल. या एसयूव्हीची डिलिव्हरी येत्या काही आठवड्यांत सुरू होईल. ही एक SUV-कूप शैलीची इलेक्ट्रिक कार असून या SUV ने जानेवारी-जून 2023 पहिल्या सहामाहीत कंपनीच्या एकूण विक्रीत 25 टक्के योगदान दिले असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

जाणून घ्या खासियत

व्होल्वो हे लक्झरी आणि स्मार्ट वाहन उद्योगातील मोठे नाव असून कंपनीचे भारतीय बाजारपेठेतील हे दुसरे इलेक्ट्रिक वाहन आहे. हे लक्षात घ्या की कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक कार XC40 रिचार्ज उपलब्ध आहे. मात्र ती पेट्रोल व्हर्जनमध्ये आहे.

असे आहे डिझाइन आणि लूक

C40 रिचार्ज ही त्याच्या आधीच्या SUV मॉडेल्ससारखे दिसते. परंतु या कारच्या मागील भाग आणि छताला कूप-स्टाईल फिनिश देऊन थोडा वेगळा लूक कंपनीने दिला आहे. टेलगेट आणि टेल-लॅम्प असेंब्लीची पुनर्रचना केली आहे, टेल लॅम्प लहान असून त्यांना रॅपराउंड इफेक्ट देण्यात आला आहे. शिवाय त्यांना नवीन रिव्हर्स लाइट्स देखील मिळतात.

जाणून घ्या कारची वैशिष्ट्य:

यात थोरच्या हॅमर आकाराच्या एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह हेडलॅम्पसह सुसज्ज असेल. या कारच्या समोरचा बंपर, हुड आणि दरवाजे इत्यादी मागील मॉडेलप्रमाणेच असणार आहेत. यात, कंपनीकडून ड्युअल-टोन 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे एसयूव्ही साइड प्रोफाइलमध्ये आणखी सुधारणा करतात. कारच्या खालच्या भागाला प्लॅस्टिक क्लेडिंग मिळते.

यात खास पिक्सेल एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत, जे तुम्हाला भारतीय बाजारातील इतर कोणत्याही व्होल्वो कारमध्ये पाहायला मिळत नाहीत. यात एक स्पॉयलर मिळतो, C40 रिचार्जची मागील रचना XC40 रिचार्जपेक्षा खूपच स्पोर्टियर सारखी दिसते. शिवाय, खिडकीच्या लाइनची थोडीशी पुनर्रचना करण्यात आली आहे.

लांबी

लांबी4440 मिमी
रुंदी1873 मिमी
उंची1591 मिमी
सीट्स5 व्यक्ती
हेडरूम समोर / मागील1040 मिमी / 932 मिमी
बूट स्पेस 413 लीटर

मिळतील लक्झरी आणि प्रीमियम वैशिष्ट्य

C40 रिचार्ज अनेक लक्झरी आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल. कारच्या केबिनमध्ये, तुम्हाला एक सामान्य व्होल्वो डॅशबोर्ड पाहायला मिळेल, ज्यात 9.0-इंच पोर्ट्रेट शैलीची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या शैलीत एसी व्हेंट जोडण्यात आले आहेत. सेंटर कन्सोल मध्ये जास्त बटणे मिळत नाहीत.

जाणून घ्या बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज

कंपनीच्या नवीन कारमध्ये 78kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, ज्यामुळे ही कार एका चार्जमध्ये 530 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते, असा दावा कंपनी करते. तर दुसरीकडे, ICAT नुसार, त्याची ड्रायव्हिंग रेंज काही विशिष्ट परिस्थितीत तब्बल 683 किमी पर्यंत जाते. कंपनीने नवीन पिढीतील बॅटरी पॅकचा समावेश केल्याने जबरदस्त ड्रायव्हिंग रेंज मिळते. 150kW क्षमतेच्या DC फास्ट चार्जरसह त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी केवळ 27 मिनिटांचा अवधी लागतो.

तुम्हाला या इलेक्ट्रिक SUV मध्ये 12.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला मिळेल. पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, फुल सूट सेन्सर्स, सर्वोत्तम प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS), पॉवर फ्रंट सीट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान तसेच ड्रायव्हर साइड मेमरी फंक्शन, हीटिंग आणि कूलिंग, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, हरमन कार्डनची प्रीमियम साउंड सिस्टीम अशी हटके फीचर्स यात देण्यात आली आहेत.

ड्युअल-मोटर सेटअप

कॉम्पॅक्ट मॉड्यूलर आर्किटेक्चर (CMA) वर याचे डिझाइन करण्यात आले असून यात ड्युअल-मोटर सेटअप दिला आहे, जो सर्व एक्सलवर स्थापित करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रितपणे 408hp पॉवर आणि 660Nm टॉर्क जनरेट करतात. ही एसयूव्ही केवळ 4.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवते.

बूट स्पेस

या कारमधील जागेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात तुम्हाला 413 लीटरची बूट स्पेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यक वस्तू ठेवता येतील. उतार असणाऱ्या छतामुळे, केबिनच्या मागील बाजूस हेडरूमसाठी मिळणाऱ्या जागेवर तुम्हाला थोडी तडजोड करावी लागणार आहे. ही एसयूव्ही पूर्णपणे लेदर फ्री आहे असा कंपनीचा दावा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe