Toyota ची नवी हायब्रिड SUV फॉर्च्युनरला देणार टक्कर ? 25 लाखांमध्ये हे फीचर्स जबरदस्त!

Karuna Gaikwad
Published:

टोयोटा भारतातील आपली उपस्थिती वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. याची पुष्टी तब्बल २५ लाख रुपयांच्या नवीन RAV4 SUV च्या आगमनाने झाली आहे. अलीकडेच, या SUV चे स्पाय शॉट्स समोर आले असून ती भारतात आयात केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात LC Prado लाँच झाल्यानंतर लगेचच ही नवीन SUV दिसली आहे. चला यावर एक नजर टाकूया.

भारतात टोयोटाची नवी SUV!

जपानी ऑटोमेकर टोयोटाने आपल्या आगामी SUV बद्दल अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, अलीकडेच समोर आलेल्या स्पाय शॉट्समुळे RAV4 SUV भारतात दाखल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या स्पाय शॉट्समध्ये ही SUV एका कार कॅरियर ट्रकवर लोड केलेली आणि दुर्गापूरजवळ दिसली आहे. RAV4 SUV जागतिक मॉडेलप्रमाणेच डिझाइनसह येते आणि ती निळा, लाल आणि राखाडी अशा तीन रंगांमध्ये दिसली आहे.

हायब्रिड टेक्नॉलॉजी असलेली SUV

या SUV वरील HEV (Hybrid Electric Vehicle) बॅज सर्वात मोठे आकर्षण आहे. याआधीही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की टोयोटा भारतात हायब्रिड RAV4 लाँच करू शकते. पॉवरट्रेन आणि इंजिन स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास यात 2.5-लिटर, 4-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर सपोर्ट, 2WD व्हेरिएंट – 218 BHP पॉवर आउटपुट, AWD व्हेरिएंट – 222 BHP पॉवर आउटपुट,

इंटीरियर आणि फीचर्स

SUV च्या इंटीरियरचे कोणतेही स्पाय शॉट्स उपलब्ध नाहीत. मात्र, ती आंतरराष्ट्रीय मॉडेलसारखीच प्रीमियम फीचर्ससह येईल अशी अपेक्षा आहे. यात समाविष्ट असू शकते: ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्री,मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Wireless Apple CarPlay आणि Android Auto, हाय-फाय साउंड सिस्टम

लाँच आणि किंमत

टोयोटाने याआधी RAV4 भारतात आणण्याची योजना केली होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, नवीन स्पाय शॉट्स पाहता, आता या SUV च्या भारतातील लाँचबाबत स्पष्ट संकेत मिळत आहेत. लाँच झाल्यास, ही SUV टोयोटा फॉर्च्युनरच्या खाली म्हणजेच सुमारे २५-३० लाख रुपये किंमतीत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टोयोटाच्या या नव्या SUV मुळे भारतातील हायब्रिड SUV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe