ब्रेकिंग : यामाहाने लाँच केली ‘ही’ नवीन बाईक, TVS Apache RTR 160 ला टक्कर देणार

Published on -

Yamaha FZ Rave – नवीन स्पोर्ट बाईक घेण्याचा प्लॅन बनवताय का? मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. यामाहा कंपनीने भारतात आपली नवीन बाईक लाँच केलीये. कंपनीने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी FZ-Rave बाईक अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च केली आहे.

भारतीय मार्केटमध्ये औपचारिक रित्या या गाडीची लॉन्चिंग झाल्यानंतर आता स्पोर्ट बाईक घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी टीव्हीएसच्या Apache RTR 160 ला थेट टक्कर देणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण या नव्याने लॉन्च झालेल्या Yanaha FZ-Rave बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या गाडीची किंमत, स्पेसिफिकेशन, फीचर्स अशा सगळ्या गोष्टी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

इंजिन कसे आहे ? 

या गाडीच्या इंजिन बाबत आणि परफॉर्मन्स बाबत बोलायचं झालं तर कंपनीने यात 149 सीसी सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन उपलब्ध करून दिलेले आहे. हे इंजिन 12 एचपी पॉवर 7,250 rpm वर आणि 13.3 Nm टॉर्क 5,500 rpm वर निर्माण करण्यास सक्षम राहणार आहे.

कंपनीने या बाईकला पाच स्पीड गिअर बॉक्स दिला आहे. ह्या इंजिनचे वैशिष्ट्य म्हणजे स्मूथ पॉवर डिलिव्हरी आणि उत्कृष्ट मायलेज. यामुळे ही गाडी डेली यूज साठी सुद्धा फायदेशीर राहणार आहे.

या गाडीचे लुक ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणारे राहतील. या गाडीची थेट स्पर्धा टीव्हीएस अपाची आरटीआर 160 सोबत आहे. पण अपाचीचे इंजिन या गाडी पेक्षा थोडे शक्तिशाली दिसते. 

किंमत किती आहे ? 

या नव्या बाईकची किंमत 1.17 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. खरे तर ही गाडी ग्राहकांसाठी दोन रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. मॅट टायटन आणि मेटॅलिक ब्लॅक या दोन कलर मध्ये ही गाडी ग्राहकांना उपलब्ध राहील.

विशेष म्हणजे दोन्ही कलर ऑप्शन मध्ये गाडीची किंमत सारखीच आहे. TVS Apache RTR 160 2V ची किंमत मात्र या गाडी पेक्षा थोडी कमी आहे. TVS Apache ग्राहकांना 1.11 लाख एक्स शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली जात आहे.

एफझेड सीरिजमधील ही नवी बाईक आकर्षक डिझाइन, संतुलित प्रपोर्शन आणि अर्बन राइडिंगसाठी उपयुक्त फीचर्स यामुळे नवयुवक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरणार असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या गाडीला पण आधीच्या मॉडेल प्रमाणेच ग्राहकांकडून प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe