अहिल्यानगरच्या भाजी बाजारात २५३३ क्विंटल भाजीपाल्यांची आवक, जाणून घ्या कोणत्या भाज्यांचे काय आहेत दर?

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी २५३३ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ७२२ क्विंटल बटाट्याची, तर ६६६ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १६०० रुपये भाव मिळाला. वांगे, दोडक्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर बाजार समितीत गुरुवारी वांग्यांची ३० क्विंटल आवक झाली होती. वांग्यांना प्रतिक्विंटल २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. काकडीची १२४ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. गवारीची ७ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ७००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ७४ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. कोबीची ११६ क्विंटल आवक झाली होती.

कोबीला ८०० ते २००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ७ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची ९ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कारल्याची २१ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये भाव मिळाला. कैरीची २३ क्विंटलवर आवक झाली होती.

कैरीला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ५३ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला
प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वालाची २ क्विंटल आवक झाली होती. वालाला प्रतिक्विंटल ५००० ते १०००० रुपये भाव मिळाला. घेवड्याची ९ क्विंटल आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

रताळ्याची १६७ क्विंटलवर आवक, २६०० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी चवळीच्या शेंगांची साडेतीन क्विंटलवर आवक झाली होती. चवळीला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. बीटाची ४ क्विंटल आवक झाली होती. बिटाला १००० ते २००० रुपये भाव मिळाला. आषाढीच्या पार्श्वभूमीवर रताळ्याची १६७ क्विंटल आवक झाली होती. रताळ्याला प्रतिक्विंटल २००० ते २६०० रुपये भाव मिळाला. डांगराची २९ क्विंटलवर आवक झाली होती. डांगराला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला.

हिरव्या मिरचीची भाव स्थिर, प्रतिक्विंटल ३५०० पर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी हिरव्या मिरचीची ६५ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची २८ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ४००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, शेवग्याची २७ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल २००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची ५० क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मेथी जुडीला ४ ते १२ रुपयांपर्यंत भाव

पालेभाजांच्या २२ हजार ७१७ जुड्यांची आवक झाली होती. यामध्ये मेथीच्या ९८२८ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ४ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १० हजार ९४७ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला ४ ते १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या १२५८ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू भाजीच्या जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या ७६७जुड्यांची आवक झाली होती. पालक भाजीच्या जुडीला ११ ते १७ रुपये भाव मिळाला.

भुईमुगाच्या शेंगांना प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी ६१ क्विंटल भुईमुगाच्या शेंगांची आवक झाली होती. भुईमुगाच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३७०० ते ४५०० रुपये भाव मिळाला. आद्रकची ४९ क्विंटल आवक झाली होती. आद्रकला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. गाजराची २६ क्विंटल आवक झाली होती. गाजराला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दुधी भोपळ्याची ५० क्विंटल आवक झाली होती. दुधी भोपळ्याला प्रतिक्विंटल ४०० ते १६०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!