Ahmednagar Kanda Rate : राहुरीत कांद्याला १७०० रुपये भाव

Published on -

Ahmednagar Kanda Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात ५५ हजार ९६७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १७०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

काही अपवादात्मक गोण्यांना २३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ११०१ ते १७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला,

तर दोन नंबर कांद्यास ६०१ ते ११००, तीन नंबर कांद्यास १०० ते ६०० रुपये तसेच गोल्टी कांद्यास २०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. काही अपवादात्मक गोण्यांना १७०० ते २३०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe