अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची २४२० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोच्या भावाची तेजी कायम आहे. टोमॅटोची २२२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ६०४ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते २३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ३७ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ३०० ते ४००० रुपये भाव मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत काकडीची ९७ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ३०० ते १२०० रुपये भाव मिळाला. गवारीची ८ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ४००० ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लावरची ८३ क्विंटल आवक झाली होती. फ्लावरला ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ८ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची १३ क्विंटल आवक झाली होती.

दोडक्याला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. कारल्याची ४९ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ३३ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल ७०० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोबीची ४० क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये भाव मिळाला.
वालाची १७ क्विंटल आवक झाली होती. वालाला १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची ११ क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गाजराची ११ क्विंटलवर आवक झाली होती. गाजराला प्रतिक्विंटल १२०० ते २८०० रुपये भाव मिळाला.