Cotton Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस बाजारातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. या पांढऱ्या सोन्याची लागवड देशभरात केली जाते.
पण जेव्हा लागवडीच्या क्षेत्राचा विचार येतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी घ्यावे लागते. कारण की, आपल्या राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.
मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा पहिला क्रमांक लागतो. अर्थातच आपल्या राज्यात कापसाची उत्पादकता कमी आहे. एक तर आधीच कापसाची उत्पादकता कमी आहे आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजारभाव खूपच कमी झाले होते. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.
पण आता कापुस बाजारातून आशादायी चित्र समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कापसाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. वास्तविक कापसाच्या वायद्यात गेल्या आठवड्याभरापासून वाढ होत होती. मात्र बाजार समितीमध्ये दर वाढत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायमच होती.
पण आता बाजार समितीमध्ये देखील बाजार भाव वाढले आहेत. सध्या देशातील जवळपास सर्वच बाजारात कापसाचे कमाल बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे बाजार भाव टिकून आहेत. दरम्यान आज आपल्या राज्यात कापसाला सर्वोच्च दर मिळाला आहे.
दिनांक ९ ऑगस्ट रोजी राज्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 7,700 प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. राज्यात आता कापसाचे बाजार भाव 8,000 च्या घरात पोहोचले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.
पण सध्या खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने या दरवाढीचा फायदा काही बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. सध्या देशांतर्गत कापसाला 6300 ते 7500 दरम्यान सरासरी दर मिळत आहे.