ग्राहकांची चंगळ,पालेभाज्या झाल्या स्वस्त

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : गेल्या आठवड्यात ढगाळ हवामान होते.यामुळे पालेभाज्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो या शक्यतेने शेकऱ्यांनी तातडीने पालेभाज्या काढण्याची घाई केली.परिपक्व न झालेल्या पालेभाज्या बाजारात दिसू लागल्या.त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत.आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

मेथी दहा ते पंधरा रुपयांना जुडी मिळते.शेपू, पालक, करडई तसेच कोथंबीरही अवघ्या दहा ते पंधरा रुपयांना एक जुडी मिळते.तसेच येथील बाजार समितीत गवारीचा क्विंटलचे भाव गगनाला भिडले आहेत.तब्बल आठ ते चौदा हजार रुपये क्विंटलला भाव गवारीला आहे.त्या खालोखाल शेवगा व कारल्याचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.कारल्याला दोन हजार रुपये व तांदळेला तीन हजारांचा बाजारभाव आहे.

त्याचबरोबर लसून, शेवगा व दोडक्याचे बाजारभाव टिकून आहेत.तसेच शेवगा, गवारीचे बाजारभाव वाढलेले आहेत.येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे टोमॅटो ३०० ते १३००, वांगी ५०० ते २०००, फ्लावर ३०० ते २०००, कोबी २०० ते ८००, काकडी ६०० ते २५००, गवार ५००० ते १००००, घोसाळे १००० ते ४०००, दोडका १००० ते ५०००, कारले १५०० ते ५०००, हळद ४००० ते ४०००, कैरी २००० ते १८००, भेंडी १५०० ते ५०००, वाल १००० ते ५०००

घेवडा २०० ते ४०००, तांदुळे ३००० ते ५०००, डिंगरी १००० ते ३५००, बटाटे ४०० ते २३००, लसून ९००० ते २६०००, हिरवी मिरची २००० ते ७०००, पकांडा ३५०० ते ६०००, आवळा २००० ते २५००, शेवगा २००० ते ७०००, ढेमसे २५०० ते २५००, लिंबू १००० ते ५५००, आद्रक २००० ते ३५००, गाजर १००० ते २५००

दुधी भोपळा ५०० ते २०००, मका कणसे १०० ते १६००, शिमला मिरची १०० ते ४०००, मेथी १००० ते २०००, कोथंबिर ९०० ते ३७००, पालक १००० ते १२००, करडई भाजी १२०० ते २५००, शेपू भाजी १८०० ते २०००, पुदीना ३००० ते ३०००, चवळी २५०० ते ३०००, बीट २००० ते २५००, हरभरा १४०० ते १४००

वाटाणा १५०० ते ४०००, डांगर ८०० ते १५००, कांदापात १६०० ते २२००, बांलंटी ४००० ते ५०००. त्याच बरोबर मोसंबी ५०० ते ६०००, संत्रा १००० ते ६५००, डाळींब २००० ते २०५००, पपई ५०० ते २०००, सिताफळ १००० ते ५०००, रामफळ ४०००, ६०००, नारळ २००० ते २५००, अननस २२०० ते ५०००, चिकू १५०० ते ५०००

द्राक्षे ४५०० ते १००००, अॅपल बार ५०० ते ३५००, सफरचंद ९५०० ते १२५००, पेरू ५०० ते ४०००, कलिंगड १००० ते २२००, खरबुज १००० ते ३०००, कडाळा १५०० ते ४०००, चमेली १२००, २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरं १५०० ते ३०००, अॅपल बोरं १००० ते २०००, केळी १३०० ते २१००, स्टोबेरी २००० ते ३५०००, चेकनर ४००० ते ६०००, इगण ९००० ते १२५०० आदी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe