Onion Price : भाव गडगडल्याने शेतकऱ्याची पुन्हा निराशा, निर्यातबंदीचा फटका मजुरांनाही ! ४० हजार लोकांची होतेय उपासमार

Onion Price

Onion Price : मध्यंतरी ४० रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. पण निर्यातबंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे.

तुलनेत लाल कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव आणखीनच घसरले. मागील २ दिवसांत दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी घसरले असून शनिवारी लिलावात सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांदा सध्या २० ते २५ रुपयाने विकला जात आहे. भाव गडगडल्याने शेतकऱ्याची पुन्हा निराशा झाली आहे.

कांदा आणखी घसरण्याची चिन्हे

सध्या मार्केटमध्ये पिंपळगाव, लासलगाव, चांदवड, सायखेडा, येवला, कळवण, बागलाण, मालेगाव, देवळा तालुक्यात लाल कांद्याची आवक १० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच उत्तरेकडील शहरांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने २५ रुपये किलो दराने कांदा विक्री करत असल्याने व्यापाऱ्यांकडील कुणीही कांदा मागणी करत नाहीत.

डिसेंबर अखेरपासून लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरवात होते. आता मार्केटमध्ये पुढील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील कांदा येईल त्यामुळे आता हे दर आणखीन घसरतील अशी शक्यता आहे.

निर्यातबंदीचा फटका मजुरांनाही ! ४० हजार लोकांची होतेय उपासमार

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच आहे. परंतु सोबतच याचा फटका मजुरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. याचे कारण असे व्यापाऱ्यांना परवडत नसल्याने व दररोज दर घसरत असल्याने व्यापारीही नुकसानीत व्यवसाय करु इच्छित नाहीत.

त्यांनी सध्या काम बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४० हजार कांदा मजुरांना काम नाही. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली असल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe