शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला हंगामातील सर्वोच्च भाव, जाणून घ्या काय भाव मिळाला?

Ahmednagarlive24 office
Updated:
Onion Market Price

Onion Market Price : गेल्या काही दशकापासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा तसेच सुलतानी संकटाचा मोठा फटका बसत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे कायमच आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

विशेषता, कांद्याच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण अधिक घातक ठरत आहे. कांदा निर्यातीसाठी केंद्र शासनाने कोणतेच धोरण ठरवलेले नसल्याने याचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांनाच बसत आहे.

याच कारणाने या चालू वर्षात जवळपास पाच ते सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल दरात कांद्याची विक्री करावी लागली होती.

फेब्रुवारी ते जून महिन्याच्या काळात कांदा निर्यात बंद असल्याने तसेच देशांतर्गत कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आणि देशातील कांद्याची मागणी घटल्याने कांद्याच्या बाजार मंदीत आला होता. कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. कांदा पीक उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च हा हजारोंच्या घरात असतो.

अशा स्थितीत त्यावेळी मिळणारा हा भाव खूपच कमी होता. यामुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता जुलै महिन्यापासून कांदा बाजार भावात तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चालू महिन्याच्या अखेर पासून बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सप्टेंबर महिन्यात या चालू हंगामात आत्तापर्यंत जेवढा भाव मिळालेला नाही तेवढा भाव मिळणार असा आशावाद देखील व्यक्त होत आहे. एका रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात कांद्याला किरकोळ बाजारात 70 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज आहे.

अशातच आज अर्थातच आठ जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला तब्बल 3,200 रुपये प्रति क्विंटलचा कमाल भाव मिळाला आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर ?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, आज झालेल्या लिलावात राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे.

या मार्केटमध्ये आज 348 क्विंटल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200, कमाल 3200 आणि सरासरी 2200 चा भाव नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe