जगातील सर्वात महागड्या आंब्याची चर्चा होते, तेव्हा मियाझाकीचे नाव सर्वात आधी येते. या आंब्याची लागवड जपानमध्ये केली जाते. पण आता भारतातील शेतकऱ्यांनीही मियाझाकी आंब्याची शेती सुरू केली आहे. चव आणि सुगंधासाठी हा आंबा जगभर ओळखला जातो. हा आंबा जगातील सर्वात महागडे फळ म्हणूनही ओळखले जाते. एक किलो मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये आहे.
भारतातही होते उत्पादन
मियाझाकी आंबा हा खरं तर जपानचा आहे. परंतु आहात भारतात झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशामधील शेतकऱ्यांनीही मियाझाकी आंबा पिकवून चमत्कार केला आहे. शेतकऱ्याचा दावा आहे की, त्याने त्याच्या बागेत जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी लावला आहे. तो पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याचे नाव भोई आहे. तो ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या बागेत जपानची प्रसिद्ध मियाझाकीची लागवड केली आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?
हा आंबा त्याच्या अनोख्या चवीसाठी आणि गोडव्यासाठी ओळखला जातो. जागतिक बाजारात त्याची किंमत प्रति किलो अडीच लाख ते तीन लाख रुपये आहे. आंब्याच्या प्रजातीत हा आंबा सर्वात गोड आंबा म्हणून ओळखला जातो. त्याचा वासही इतर आंब्यापेक्षा वेगळा असतो. आपल्या गोडीमुळेच हा आंबा सध्या जगभर प्रसिद्ध झाला आहे.
सूर्याचे अंडेही म्हणतात
मियाझाकी आंब्याचे मूळ नाव ‘तैयो नो तामागो’ आहे. काही जण त्याला सूर्याचे अंडे असेही म्हणतात. जपानमधील मियाझाकी राज्यात त्याची लागवड केली जाते. म्हणूनच त्याचे नाव मियाझाकी पडले. विशेष म्हणजे जगातील फक्त श्रीमंत लोकच तो खातात. हे आंबे बाजारात विकले जात नाही, तर त्यांचा लिलाव होतो. अलिकडेच रायपूर आणि सिलिगुडी येथे झालेल्या आंबा महोत्सवात मियाझाकी आंबे प्रदर्शित करण्यात आले होते.