पालेभाज्यांची आवक वाढली ; गवार,लसूण,शेवगा,टोमॅटो तेजीत

Sushant Kulkarni
Published:

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. मात्र त्या तुलनेत गवार, लसूण, शेवगा, टॉमेटो यांचे भाव काहीशा प्रमाणात वाढलेले आहेत.

सध्या बदलत्या हवामानामुळे शेती करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे पीक पद्धतीत बऱ्यापैकी बदल झालेले आहेत. या बदलाचा फटका बसला असल्याने लसणाची लागवड अत्यंत कमी प्रमाणात केली आहे. त्यामुळे बाजारात लसणाची आवक कमी होत आहे.

नवीन लसूण अद्याप बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्यासाठी बराच काळ लागणार आहे.त्यामुळे मागील दोन वर्षांपासून लसणाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.अशीच अवस्था शेवग्याचीही झालेली आहे.पावसाने शेवग्याचा बहार गळून गेल्याने शेवग्याचे भाव वाढले आहेत. त्या तुलनेत इतर भाजीपाला स्वस्त झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : वांगी ५०० ते २५००, टोमॅटो २०० ते १५००, फ्लावर, कोबी ४०० ते ३००, काकडी ५०० ते २५००, गवार ३५० ते १२००, घोसाळे १००० ते ४०००, दोडका ४००० ते ९५००, कारले १००० ते ५०००, मुरण ४००० ते ४०००, भेंडी ८०० ते ४०००, वाल १००० ते ४०००, घेवडा १००० ते ४०००, डिंगरी १००० ते ४०००, बटाटे ५०० ते २५००, लसून १००० ते २९०००, हिरवी मिरची २५०० ते ७०००, पकोडा २५०० ते ६०००, आवळा २००० ते ६०००,

शेवगा ३५०० ते १००००, ढेमसे ३००० ते ४०००, १००० ते ५५००, आद्रक २४०० ते ४०००, गाजर १००० ते २०००, दुधी भोपळा ४०० ते १५००, मका कणसे ६०० ते १५००, शिमला मिरची ८०० ते ३६००, मेथी ६०० ते १२००, कोथंबिर ९०० ते २१००, पालक ८०० ते १४००, करडई भाजी १५०० ते १८००, शेपू भाजी ८०० ते १८००

पुदीना ३००० ते ३०००, चवळी १००० ते ४०००, बीट २००० ते ४०००, हरभरा १४०० ते २४००, वाटाणा २५०० ते ५५००, डांगर १५०० ते २५००, कांदापात १००० ते १६००, बांलंटी ५०० ते ५०००. त्याच बरोबर मोसंबी १००० ते ५००, संत्रा ५०० ते १५००, डाळींब २००० ते १५०००, पपई ४०० ते १५००, सिताफळ १००० ते ४०००

नारळ २५०० ते २५००, अननस १९०० ते ५०००, चिकू २००० ते ४०००, द्राक्षे ११२०० ते ११२००, अॅपल बोर १००० ते १५००, सफरचंद ८५०० ते १२५०, पेरू ८०० ते २७००, कलिंगड ३०० ते १००, खरबुज १००० ते ३०००, कडाळा १५०० ते ४०००, चमेली १२००, २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरं ३००० ते ३०००, पलम १२५००, १२५००, केळी १३०० ते २२००, स्टोबेरी २००० ते ३०००, चेकनर ३००० ते ५०००, उमराण ५०० ते १०००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe