Ahmednagar News : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तिसगाव उपबाजार समितीत शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लिलावात कांद्याला सुमारे २१०० दर मिळाला असुन, नगर बाजार समिती, नेवासा बाजार समिती घोडेगाव उपबाजार समितीच्या तुलनेत चांगला भाव मिळाला आहे.
याबाबत शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांनी दिली.
शुक्रवारी ४ ऑगस्ट रोज तिसगाव उपबाजार समितीत १४०४ क्विटल कांदा आवक झाली. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला १५०० ते २१०० रुपये, दोन नंबर १२०० ते १५०० रुपये, तीन नंबर ५०० ते १२०० रुपये, चार नंबर २०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीत एकुण ४१००९ क्विटल कांदा आवक झाली. तेथे एक नंबर कांद्याला १६०० ते २००० रुपये, दोन नंबर ११०० ते १६०० रुपये, तीन नंबर ६०० ते ११०० रुपये, चार नंबर २०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
तर नेवासा कृषि उत्पन्न बजार समितीच्या घोडेगाव उपबाजार समितीत एकुण ८२७२७ गोण्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला १६०० ते १७०० रुपये, दोन नंबर १५०० ते १६०० रुपये, तीन नंबर १४०० ते १५०० रुपये तर चार नंबर कांद्याला ८०० ते १३०० रुपये प्रति क्विटल दर मिळाला.
इतर बाजार समितीच्या तुलनेत तिसगाव उपबाजार समितीत २१०० रुपये म्हणजेच १०० रुपये भाव अधिक मिळाला असुन. तिसगाव उपबाजार समिती मध्ये शेतकरी व व्यार्पायांना समीतीकडून चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत.
तरी परिसरासह तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा माल तिसगाव उपबाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे अवाहन सभापती सुभाष बर्डे यांनी व संचालक मंडळाने केले आहे.