Onion Market Ahmednagar : कांदा @ 60 , कांद्याला ६१ रुपये भाव, शेतकऱ्यांत समाधान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Onion Market Ahmednagar : मध्यंतरी कांद्याचे भाव पूर्णतः गडगडले होते. शेतकऱ्यांचा जमाखर्चही निघत नव्हता. परंतु आता कांद्याच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. कांदा तब्बल ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे. सध्या मार्केटमध्ये मागणी वाढली असून

आवक कमी झाल्याने उन्हाळी गावरान कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. गुरूवारी झालेल्या लिलावात संगमनेर बाजार समितीत कांद्याला ५५०० ते ६०११ रुपयांचा भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत ७०० ते ९०० रूपयांचा जादा दर मिळाला. कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या निलावात एक नम्बर कांद्याला प्रतिक्विंटल ५५०० ते ६०११ रुपयांपर्यंत भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ४५०० ते ५४०० रुपये भाव मिळाला. तर गोल्टी कांद्याला ५०० ते २००० रुपये भाव मिळाल्याची माहिती संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली.

कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. सध्या अनेकांनी कांदा साठवलेला आहे. तो बाजारात आणला जाईल. त्यामुळे शेततकऱ्याचे आर्थिक गणित सुधारणार आहे. परंतु सध्या भाव वाढलेलं असले तरी शेतकऱ्यांकडे कांदा कमीच आहे.

दरम्यान बाजार समितीत टोमॅटोला देखील चांगला भाव मिळाला. उच्च प्रतीच्या टोमॅटोला प्रतिकॅरेट १०० ते २५० रुपयापर्यंत भाव मिळाला. त्या खालोखाल ५० ते ९० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मालाला चांगले भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातवरण आहे.

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणताना प्रतवारी करून आणावे असे आवाहन सभापती शंकरराव खेमनर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe