अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला मिळतोय १६०० रुपयांपर्यंत भाव, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३१ हजार १३१ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव भाव पडलेलेच असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्याला २०० ते ५०० रुपये भाव मिळाला.

नगरमध्ये कांद्याला कमीतकमी प्रतिक्विंटल २०० रुपये, तर मध्यम प्रतिचा ९५० रुपये व जास्तीत जास्त १६०० रुपय भाव मिळाला. अपवादात्मक भाव म्हणून ६२ कांदा गोण्याच्या लॉटला प्रतिक्विंटल १८०० रुपये, तर ८३ गोण्यांना १७०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. दरम्यान, कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला असून कांद्याचे भाव वाढण्याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

दरम्यान, नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात गावरान उन्हाळ कांद्याची ७२ हजार ५२१ गोण्यांची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १५०० रुपये, दोन नंबर कांद्याला १२०० ते १३०० रुपये, तीन नंबर कांद्याला १००० ते ११०० रुपये भाव मिळाला. गोल्टा कांद्याला १००० ते ११०० रुपये, गोल्टी कांद्याला ६०० ते ७०० रुपये, तर जोड हलक्या कांद्याला २०० ते ५०० रुपये भाव मिळाला. अपवादात्मक भाव म्हणून १६०० ते १८०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!