अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- हाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6276 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2700 रुपये इतका भाव मिळाला.
तर सोयाबिनला 6135 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 6 हजार 276 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2700 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1450 ते 2250 रुपये, कांदा नंबर 3 ला उन्हाळी 500 ते 1400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1700 ते 1900 रुपये भाव मिळाला.
जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला. सोयाबिनला कमीत कमी 6075 रुपये व जास्तीत जास्त 6135 रुपये तर सरासरी 6100 रुपये क्विंटलला भाव मिळाला.
तुरीला 5615 रुपये, उडीदास 4499 रुपये, तर हरबरा 4200 रुपये तर गव्हाला 2185 रुपये भाव मिळाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम